गेले अनेक दिवस रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. अनेक वेळा चर्चा करूनही या युद्धाला विराम मिळालेला नाही. रशियाची क्षेपणास्त्रे आज पुन्हा युक्रेनवर धडकली आहेत. लिव्ह येथील लष्करी विमान कारखान्यावर एकामागून एक अशी सहा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यातील दोन क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात युक्रेनला यश आले. तरी या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फक्त युक्रेनची बस फॅक्टरीही उद्ध्वस्त झाली आहे.
युक्रेनमध्ये सकाळी सहा वाजता एकामागून एक तीन स्फोटके ऐकू आलीत. त्यानंतर थोड्या वेळाने तीन स्फोटकांचा आवाज झाला. जवळपास राहणाऱ्या एका नागरिकाने सांगितले की, या स्फोटामुळे त्यांची इमारत हादरली आणि लोकांमध्ये गोंधळ उडाला. या क्षेपणास्त्रांनी पश्चिम युक्रेनियन शहर ल्विव्हमधील विमानतळाजवळील विमान दुरुस्ती प्रकल्प नष्ट केला आहे.
तसेच रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमधील निवासी परिसरात हल्ला केला. या हल्ल्यात एक जण ठार आणि १९ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. एवढे हल्ले होऊनही युक्रेन युद्ध संपवण्याच्या कराराचा एक भाग म्हणून रशियाशी तडजोड करण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा आपला प्रयत्न सोडणार नाही, असे झेलेन्स्कीचे कर्मचारी उपप्रमुख म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जपानचे पंतप्रधान येणार भारतात
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा
कोल्हापूरमधून जप्त केला २५ लाखांचा मद्यसाठा
दुसरीकडे, जगातील विविध देशांकडून रशियावर निर्बंधांचा ओघ सुरूच आहे. आज त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानचीही नावे जोडली गेली आहेत. ऑस्ट्रेलियाने अकरा रशियन बँका आणि सरकारी संस्थांवर बंदी घातली, तर न्यूझीलंडने तीनशेहून अधिक रशियन लोकांना प्रवेश नाकारला आहे. याशिवाय प्रॉम्सवाझ बँकेवरही बंदी घातली आहे. त्याच वेळी, जपानने नऊ रशियन कंपन्या आणि लोकांवर नवीन निर्बंध लादले आहेत.