23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियारशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

हल्ल्यात १३० हून अधिक जण जखमी

Google News Follow

Related

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दीड वर्षापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध कधी थांबणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं असतानाचं आता रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला चढवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांनी एकमेकांवर कुठलाही मोठा हल्ला केला नव्हता. परंतु, शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी रशियाने युक्रेनवर तब्बल १२२ क्षेपणास्रं डागली. यासह ३६ ड्रोन हल्ले केले. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनमधील ३१ नागरिकांचा बळी गेला आहे.

रशियाने शुक्रवारी अचानक युक्रेनवर मोठा हल्ला केला. रशियाच्या या हल्ल्यात ३१ युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या वायूदलातील एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, या युद्धकाळात रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. तर, युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख वलेरी जालुजनी म्हणाले की, आमच्या वायूदलाने रशियाचे बहुतांश हल्ले हवेतच हाणून पाडले. रशियाची ८७ क्षेपणास्रं आणि २७ ड्रोन प्रतिहल्ल्यात पाडले.

युक्रेनच्या वायूदलाचे प्रमुख मायकोला ओलेशचुक यांनी त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर लिहिलं आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या या युद्धानंतर रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. याआधी रशियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये युक्रेनवर ९६ क्षेपणास्रं डागली होती. युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख म्हणाले, या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक इमारती, औद्योगिक वसाहती आणि सैन्यतळांचं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा:

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

कर्नाटक: एकाच कुटुंबातील पाच जणांचे घरात सापडले सांगाडे!

जुन्या फायली, खराब झालेली उपकरणे, जुन्या गाड्यांतून बाराशे कोटींची कमाई

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी रशियाच्या बाजूने कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. रशियाने आतापर्यंत नागरिकांवरील कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा