युक्रेन – रशिया युद्ध सुरु झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला युक्रेनवर झाला आहे. रशियाने शुक्रवारी युक्रेनवर एकाचवेळी ७० पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागली आहेत. युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर कीवमध्ये आपत्कालीन ब्लॅकआउट लागू करण्यास भाग पाडले आहे.
रशिया आपला आक्रमक स्वभाव सोडण्याचे नाव घेत नाही आहे. रशियन सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. अनेक देशांनी युद्ध न करण्याचे आवाहन केले आहे, पण कोणताही परिणाम दिसून येत नाही. युक्रेनवर झालेल्या या नव्या हल्ल्यात तीन लोक मरण पावले आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य कीवमधील एका इमारतीला क्षेपणास्त्राचा फटका बसला. त्यामुळे तिघांना जीव गमवावा लागला आहे. दक्षिणेत खेरसनमध्ये झालेल्या हल्ल्यात एक जण ठार झाला. पूर्व युक्रेनमधील रशियन-आधारित अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या गोळीबारात १२ लोक मारले गेले असल्याचे म्हटलं आहे.
शुक्रवारी संध्याकाळी व्हिडिओ संबोधित करताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले की रशियाकडे अजूनही अनेक मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यासाठी पुरेशी क्षेपणास्त्रे आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा पाश्चात्य मित्र राष्ट्रांना किवला अधिक आणि चांगल्या हवाई संरक्षण प्रणाली पुरवण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रपतींनी युक्रेनच्या जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला
हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ
समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू
युक्रेनच्या ईशान्येकडील राजधानी कीव आणि खार्किवमध्ये रशियाने हे हल्ले केले आहेत . रशियन हल्ल्यांमुळे खार्किव आणि सुमीच्या प्रदेशात वीज खंडित झाली, ज्यामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये ब्लॅकआउट झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनच्या अर्ध्या भागात वीजपुरवठाखंडित झाला आहे. आता फक्त रुग्णालये, पाणीपुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनाच वीजपुरवठा केला जाणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रशिया युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर साप्ताहिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत आहे, परंतु शुक्रवारच्या हल्ल्यामुळे युक्रेनचे लक्षणीय नुकसान झाले आहे.