रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे आणि ते संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात अनेक देशांचे नुकसान होत आहे. गेल्या आठवड्यात युक्रेनची राजधानी कीवमधील एका भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर गोदामात आग लागली. या हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचे मानले जात होते, परंतु रशियाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या संदर्भात, राजधानी दिल्लीतील रशियन दूतावासाने हे अधिकृत निवेदन जारी केले आहे.
भारतीय औषध कंपनी ‘कुसुम हेल्थकेअर’च्या गोदामावर रशियन क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा युक्रेनचा आरोप भारतातील रशियन दूतावासाने फेटाळून लावला आणि म्हटले, रशियन सशस्त्र दलांनी “१२ एप्रिल २०२५ रोजी कीवच्या पूर्वेकडील कुसुम हेल्थकेअरच्या फार्मसी गोदामावर हल्ला केला नव्हता किंवा हल्ला करण्याची योजना आखली नव्हती.”
दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हा युक्रेनने याचे वर्णन ‘रशियन क्षेपणास्त्र हल्ला’ असे केले होते. भारतीय व्यवसायांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला होता. पण आता युक्रेनच्या दाव्यांवर रशियाचे स्पष्टीकरण समोर आले आहे. रशियाने हे आरोप फेटाळून लावले आणि म्हटले की त्यांच्या लष्करी दलांनी कुसुम हेल्थकेअर गोदामाला लक्ष्य केले नाही.
हे ही वाचा :
नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने म्हटले, रशियाच्या सुरक्षा दलाने युक्रेनियन लष्करी औद्योगिक संकुलातील विमानचालन संयंत्र, लष्करी हवाई क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि चिलखती वाहन दुरुस्ती आणि यूएव्ही असेंब्ली कार्यशाळांवर पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी हल्ले केले. यावेळी युक्रेनियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांपैकी एक कुसुम हेल्थकेअरच्या गोदामावर पडले आणि त्यात आग लागली. तसेच अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या असल्याचे रशियन दुतावासाने म्हटले आहे.