रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!

रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!

गेल्या दहा दिवसांपासून रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. मात्र, आता रशियाने युद्धविरामाचा मोठा निर्णय घेत युक्रेनमध्ये काही तासांसाठी एकतर्फी शस्त्रसंधी लागू केली आहे. युक्रेनमध्ये युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रशियाने म्हटले आहे. मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये ही शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर एकाच आठवड्यात सुमारे दहा लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. यानंतर युद्धाच्या दहाव्या दिवशी रशियाच्या बाजूने हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित कॉरिडॉर देण्यासाठी रशियाने निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मॉस्कोतील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजल्यापासून रशियाने शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी

…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न

‘शिवसेनेच्या या दंडेलीला मी घाबरणार नाही’

हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेस, सपा नेते काशी विश्वनाथ मंदिरात

मानवी दृष्टीकोनातून नागरिकांना आवश्यक मदत पोहचवण्यासाठी आणि इतर सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरीत करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. नागरिकांचे होणारे हाल पाहता रशियाने निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. मात्र, यातून काहीही तोडगा निघाला नसल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. रशियाने युक्रेनसमोर काही अटी ठेवल्या असून त्या युक्रेनने मान्य केल्या तरच युद्ध थांबेल असे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version