रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने मोठे पाऊल उचलले आहे. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी ‘मेटा’ला रशियाने दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित केले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले आहे.
युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये रशियाच्या सरकारने आपल्या नागरिकांसाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रशियन मीडिया कंपन्यांसोबत भेदभाव करत असल्याचा आरोप या काळात रशियाने केला होता. रशियन सरकारची सेन्सॉरशिप एजन्सी रोस्कोमनॅड्झर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० पासून फेसबुककडून रशियन मीडियाविरुद्ध भेदभावाची एकूण २६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
मॉस्कोच्या एका न्यायालयाने म्हटले आहे की, मेटाचे प्लॅटफॉर्म सोशल मीडिया वापरकर्त्यांना रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कंटेट शेअर करण्याची परवानगी देत आहे. तसेच मेटा ही कंपनी युक्रेनमध्ये भावना भडकावण्याचे काम करत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.
सोशल मीडिया कंपनी मेटाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. तसेच कंपनी कधीही कोणत्याही कट्टरपंथी कारवायांचा भाग नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव
भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?
युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युक्रेनला मोठा पाठिंबा होता. यामुळेच रशियाने या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.