अफगाणिस्तानवर बंदुकीच्या जोरावर राज्य करणाऱ्या तालिबानने दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि हिंसाचाराला कारणीभूत ठरू शकेल अशी वृत्ती न स्वीकारण्याचे रशियाला आवाहन केले आहे. बंदुकीच्या जोरावर आणि स्वतः हिंसाचार करून राज्य करणाऱ्या तालिबानने रशिया आणि युक्रेनला हे संकट सोडवण्यासाठी वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला आहे.
Statement concerning crisis in #Ukraine pic.twitter.com/Ck17sMrAWy
— Abdul Qahar Balkhi (@QaharBalkhi) February 25, 2022
युक्रेन संकटावर तालिबानने एक निवेदन जारी करून दोन्ही बाजूंना संयम बाळगण्यास सांगितले आहे. दोन्ही देशांमधील सध्या सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती पाहता, त्यांनी ट्विट केले की, “दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा” आणि “सर्व बाजूंनी हिंसाचार तीव्र करू शकतील अशा स्थितींपासून दूर राहणे आवश्यक आहे.” तालिबानने म्हटले आहे की दोन्ही बाजूंनी संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तालिबानने सांगितले की ते या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटात युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. २५ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजेपर्यंत सात रशियन विमान युनिट्स, सहा हेलिकॉप्टर युनिट्स, तीसहून अधिक टँक युनिट्स आणि १३० बीबीएम युनिट्स नष्ट झाल्या आहेत. याशिवाय ८०० रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनचे उप संरक्षण मंत्री हन्ना मलयार यांनी केला आहे.
हे ही वाचा:
अडकलेल्या विद्यार्थ्यांना सूचना गाड्यांवर तिरंगा लावा
‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…
खलिस्तानला विरोध केल्याबद्दल कॅनडामध्ये भारतीय रेडिओ होस्टवर हल्ला…
‘मुख्यमंत्र्यांमध्ये धमक नसल्याने ते संजय राऊतांना पुढे करतात’
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन हल्ल्यांदरम्यान जगभरातील देशांच्या वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. झेलेन्स्की म्हणाले की, रशियाशी लढण्यासाठी आम्ही एकटे पडलो आहोत.