रशिया-युक्रेनची बेलारुसमध्ये बैठक! युद्धाचे ढग ओसरणार?

रशिया-युक्रेनची बेलारुसमध्ये बैठक! युद्धाचे ढग ओसरणार?

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात आता चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. या चर्चेचा सकारत्मक परिणाम व्हावा आणि युद्धाचे ढग दूर व्हावेत अशी सर्व जगाची इच्छा आहे. त्यामुळे या अति महत्वाच्या बैठकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धात नवनवीन वळणे येताना दिसत आहेत. सोमवार २८ फेब्रुवारी रोजी या युद्धात आता बेलारूस हा देशही उतरताना दिसत आहे. बेलारूसने युद्धात थेट सहभाग नोंदवला नसला तरीही रशियाला सहाय्य करणारी भूमिका घेण्याचा निर्णय केला आहे. बेलारूसने आपल्या देशात अण्विक क्षेपणास्त्र ठेवायची परवानगी रशियाला दिली आहे. त्यामुळे या युद्धात नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी

युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री

रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त

सेबीच्या अध्यक्षपदी माधबी पुरी बुच

पण असे असले तरीही बेलारूसने या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका स्वीकारली आहे. रशियाने आपले एक शिष्टमंडळ बेलारुसमध्ये पाठवून ते शांतीवार्ता करायला तयार आहेत असे स्पष्ट केले. बेलारूस मधील गोमेल या शहरात ही बैठक पार पदवी अशी रशियाने इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला युक्रेन यासाठी तयार नव्हता. पण त्यानंतर युक्रेन आणि बेलारूस या दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाली आणि युक्रेन या चर्चेसाठी तयार झाला.

आज दुपारी ३.३० वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे शिष्टमंडळ बेलारूस येथे दाखल झाले आहे. या शांतीवार्ता मधून बैठकीतून काहीतरी सकारात्मक बाहेर पडण्याची अपेक्षा सगळेच व्यक्त करताना दिसत आहेत.

Exit mobile version