संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पाठीशी रशिया

रशियाचा कशाबद्दल भरताला पाठिंबा ?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पाठीशी रशिया

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पुन्हा एकदा पाठिंबा दर्शविला आहे. तर परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले, तसेच चर्चे दरम्यान असी संगीतले जाते की, जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर भारताने परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

७ डिसेंबर रोजी मॉस्को येथे प्रिमाकोव्ह रीडिंग इंटरनॅशनल फोरममध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना लावरोव्ह म्हणाले, भारत सध्या आर्थिक विकासाच्या बाबतीत आघाडीच्या देशांपैकी एक आहे. त्याची लोकसंख्या लवकरच इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त असेल. भारताला विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याचा मोठा राजनैतिक अनुभव आहे. असे विधान लावरोव्ह यांनी केले.

या पूर्वी देशाने कौन्सिलच्या १५ देशांच्या पाच स्थायी सदस्यांपैकी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या देशांनी संयुक्त राष्ट्र संघाला भारतात कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी पाठिंबा दिला होता. तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्रसंघ मधील यूनाइटेड किंगडम राजदूत बार्बरा वुडवर्ड म्हणाल्या, ‘आम्ही भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी नवीन कायमस्वरूपी जागेची निर्मितीकरून जागतिक परिषदा घेण्यास कायम आफ्रिकन प्रतिनिधित्वास समर्थन देतो. असे विधान राजदूत वुडवर्ड यांनी केले.

हे ही वाचा: गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य म्हणून भारताचा सध्याचा दोन वर्षांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. तसेच भारत सध्या १५ देशांच्या परिषदेचे अध्यक्ष आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे निर्वाचित सदस्य म्हणून दोन वर्षांच्या कार्यकाळात भारताने परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी ऑगस्ट मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या राष्ट्र संघाच्या अध्यक्षपद स्वीकारले होते.

Exit mobile version