कठीण समय येता रशिया कामास येतो?

कठीण समय येता रशिया कामास येतो?

भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रशियाने भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतानेही रशियाकडून ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आणि टँक खरेदी करण्याचा विचार सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. भारताने हा निर्णय घेतल्यास भारतातील ऑक्सिजनचं संकट दूर होणार आहे.

दरम्यान, सीरमच्या विनंतीनंतरही अमेरिकेने व्हॅक्सीनसाठीचा कच्चा माल देण्याबाबत मौन बाळगलेलं असताना रशियाने ऑक्सिजन पुरवठ्याचा भारताला प्रस्ताव दिला आहे. मात्र, अमेरिकेतील बड्या लॉबिने भारताला मदत करण्यासाठी बायडन प्रशासनावर दबाव वाढवला आहे.

भारतात बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोनाचं संकट अधिकच वाढलं आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील दोन रुग्णालयातील बेड्सची संख्या कमी करण्यात आली आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा उपचार करणं कठिण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. देशातील कोरोनाचं हे संकट पाहता रशियाने भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक

धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स

पंढरपूर मधील कोरोना प्रसाराला नागरिक जबाबदार

दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्या अभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील परिस्थिती अत्यंत भयानक आहे. शवागरात मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही. स्मशानभूमीत रांगाच रांगा लागल्या आहेत. मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीही कमी पडत आहेत. केवळ कोरोनामुळे लोक मरत असल्याने हे चित्रं निर्माण झालेलं नाही. तर लोकांना उपचार मिळत नसल्याने हे चित्रं निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाच नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

Exit mobile version