मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या केरळमधील शाखेला आता तिथल्या जमात ए इस्लामी हिंद या संघटनेच्या कृत्यांची चिंता वाटू लागली आहे. या गटातर्फे कट्टर धार्मिकतेचा पुरस्कार केला जात असल्याची उपरती आता, सीपीआय (एम)ला झाली आहे.
या पार्टीचे काही कागद इंडिया टुडेच्या हाती लागले आणि त्यांना त्यातून ही माहिती मिळाली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना ही कागदपत्रे वितरित करण्यात आली असून त्यात ही चिंता प्रकट करण्यात आली आहे.
केरळ राज्यात तालिबानी मानसिकतेला या कट्टरतावाद्यांकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा उल्लेख सीपीआयने केला आहे.
या कागदपत्रांत नमूद केले आहे की, जमात ए इस्लामी ही संघटना राज्यात धार्मिक भावना भडकवत आहे. केरळात आपला अजेंडा राबविण्यासाठी ही संघटना सोशल मीडिया आणि विविध वर्तमानपत्रांचा वापर करत आहेत.
यापैकी एका कागदपत्रात असे म्हटले आहे की, जमात ए इस्लामी या संघटनेचे उद्दीष्ट आहे की, केरळमध्ये इस्लामी राजवट आणणे. केरळच्या समाजात तसेच मुस्लीमांमध्ये हा विचार रुजविण्याचे काम ते करत आहेत. विविध प्रसारमाध्यमेच नव्हेत तर सोशल मीडियाचाही वापर ते यासाठी करत आहेत.
हे ही वाचा:
अमेरिकेहून परतल्यावर न थांबता पंतप्रधान मोदींनी इथे का दिली भेट?
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
अंबरनाथमध्ये बांधा-खोदा-बांधा-पुन्हा खोदा धोरणावर कोट्यवधी खर्च
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
यापैकी एका कागदपत्रात म्हटले आहे की, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. केरळमध्ये आता तालिबानींना पाठिंबा देण्याचे प्रकार वाढत आहेत. सीपीआयने आपल्या कार्यकर्त्यांना याविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहनही या कागदपत्रांच्या माध्यमातून केले आहे.
केरळातील कट्टरतावादी मुस्लिमांकडून सातत्याने कट्टर धार्मिकतेला खतपाणी घालण्याचे जे प्रयत्न होत आहेत, त्याविरोधात प्रथमच सीपीआयला जाणीव झाली आहे.