कोरोनाच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांसाठी RTP-CR चाचणी अनिवार्य केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा मागोवा घेतला जाईल आणि त्यांची चाचणी केली जाईल. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या देशांतून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल.
या प्रवाशांची विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याची माहिती मांडविया यांनी दिली. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचा मागोवा घेतला जाईल असेही मांडवीय यांनी म्हटलं आहे. ब्रिटन, पश्चिम आशिया, ब्राझील आणि चीनसारख्या निवडक देशांमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-१९ RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
ब्रिटन , युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे येथून येणाऱ्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल, असेमहापालिकेने म्हटले आहे.
हे ही वाचा :
भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात
मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी
क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी
वरील देश सोडून इतर प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडायचे आहे किंवा विमानात चढायचे असलेल्या प्रवाशांना प्रवासाच्या ७२ तासांच्या आत नकारात्मक RT-PCR अहवाल दाखवावा लागेल. सर्व प्रवाशांना विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची स्वयंघोषणा आणि हमीपत्र सादर करावे लागेल आणि १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून जावे लागेल असेही महापालिकेनं म्हटलं आहे.