जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नुकतेच एक संचलन अमेरिकेत पार पडले आहे. भारता बाहेरच्या देशात हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने रा.स्व.संघाचे कार्य चालते. या हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हे संचलन आयोजित करण्यात आले होते. तर या सोबतच राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलांचे संचलनही आयोजित केले गेले होते. फ्रेंड्स ऑफ आरएसएस या ट्विटर हॅण्डलवरून या कार्यक्रमाचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Hindu Swayamsevak Sangh, Houston Vibhag (USA) Vijayadashmi Utsav 2021. pic.twitter.com/nYqg4vUK6Z
— Friends of RSS (@friendsofrss) November 23, 2021
अमेरिकेतील ह्युस्टन या शहरात हे संचलन पार पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा उत्सवांपैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने हे संचलन पार पडले. दसरा हा हिंदू धर्मात खूप महत्वाचा दिवस मानला जातो. अधर्माचा नाश करून धर्माचे अधिपत्य स्थापित करणारा हा दिवस समजला जातो. रा.स्व.संघाच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये विजया दशमी उत्सव आणि त्यानिमीत्ताने होणारे संचलन याला खूप जास्त महत्व असते. १९२५ साली विजया दशमीच्या मुहूर्तावरच संघाची स्थापना झाली होती.
हे ही वाचा:
पडळकर, खोत एसटी आंदोलनातून बाहेर
वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले
यादिवसाचे औचित्य साधून भारतासह संपूर्ण जगभरात स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने उत्सवासाठी एकत्र जमतात. संघाच्या घोष पथकाचे वादन होते. स्वयंसेवकांचे पाठ संचलन होते. नियुद्ध, दंड, योग अशी विविध प्रात्यक्षिके होतात. तर मान्यवरांचे भाषण देखील होते. दर वर्षी विजया दशमी उत्सवाच्या निमित्ताने नागपूर येथील संघस्थानावरून सरसंघचालकांचे उद्बोधन होते.