लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!

लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!

भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला दिवाळी हा सण जवळ आला आहे. दिवाळी हा सण जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर युनायटेड किंग्डमच्या रॉयल मिंटने एक नवीन सोन्याचे बिस्किट बाजारात आणले आहे. या बिस्किटाची खासियत म्हणजे त्यावर देवी लक्ष्मी यांचे चित्र साकारले आहे.

हिंदू धर्मात देवी लक्ष्मी यांना धन आणि ऐश्वर्याची देवी मानून त्यांची पूजा केली जाते. म्हणूनच देवी लक्ष्मी यांचे चित्र या सोन्याच्या बिस्किटावर साकारण्यात आले आहे. दिवाळीत धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर भारतीय नागरिक सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करणे हे शुभ आणि भरभराट करणारे मानले जाते. ही भारतीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवूनच युकेच्या रॉयल मिंटने हे नवे बिस्किट बाजारात आणले आहे.

हे ही वाचा:

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

..आणि रोहित शर्माने क्रिकेट रसिकांच्या हृदयात घर केले

कोण आहेत फुमियो किशिदा?

अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?

या बिस्कीटाचे वजन २० ग्राम आहे. तर ९९९.९ अस्सल सोन्यापासून हे बिस्कीट बनवले गेले आहे. सोन्याच्या या बिस्कीटाची रचना एम्मा नोबल नावाच्या सुवर्णकाराने केली आहे आणि या बिस्किटाची जाडी २.१ मिमी आहे. या प्रत्येक बिस्किटाला एक स्वतंत्र असा अनुक्रमांक देण्यात आला आहे. सोन्याची ही बिस्किटे रॉयल मिंटच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या प्रत्येक बिस्कीटाची किंमत १०८० पाऊंड इतकी आहे. म्हणजेच भारतीय किंमतीनुसार तब्बल एक लाख रुपयांचे हे बिस्कीट आहे.

राॅयल मिंटने बाजारात आणलेल्या या नव्या सोन्याच्या बिस्किटांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. या बिस्कीटांना ग्राहकांचीही चांगली पसंती लाभणार असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version