रोनाल्डोचे विश्वविक्रमी ‘गोल’ साध्य!  

रोनाल्डोचे विश्वविक्रमी ‘गोल’ साध्य!  

पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात दोन गोल करत पोर्तुगालला विजय मिळवून दिला आणि सोबतच रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रमही आपल्या नावे केला. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १८० सामन्यांमध्ये १११ गोल केले आहेत. इराणचा माजी फुटबॉलपटू अली दाईचा १०९ गोलचा विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.

आयर्लंड आणि पोर्तुगालमध्ये झालेल्या सामन्यात १ गोलची आघाडी घेऊन आयर्लंड पोर्तुगालवर विजय मिळवणार असे चित्र असतानाच पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोने अखेरच्या मिनिटाला दोन विश्वविक्रमी गोल केले आणि सामना जिंकला. “मी सध्या खूप खुश आहे. माझ्या विक्रमामुळे नव्हे तर आम्ही मिळवलेल्या विजयामुळे. आम्ही अनेकांना अशक्य वाटेल असा विजय साध्य केला. आमच्यावर विश्वास दाखवलेल्या चाहत्यांचे आभार” असे मत रोनाल्डोने व्यक्त केले.

हे ही वाचा:

देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?

ठाकूर तो छा गियो

२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत

ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही

रोनाल्डोने पोर्तुगालचे आभार मानले. तसेच त्याने त्याचा प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी त्याच्या संघातील खेळाडूंचे आणि विरुद्ध संघातील खेळाडूंचेही आभार मानले. पुढील वर्षांमध्ये मैदानात भेटत राहू; गोलची मोजणी इतक्यात थांबणार नाही, असेही रोनाल्डोने सांगितले.

रोनाल्डोने अली दाई यांच्या १०९ गोलची बरोबरी युरो स्पर्धेत केली होती. दाई यांनी १९९३ ते २००६ दरम्यान १४९ सामन्यात १०९ गोल करण्याचा विश्वविक्रमी पराक्रम केला होता. रोनाल्डोने ही लढत सर्जिओ रोमास याच्या सर्वाधिक १८० आंतरराष्ट्रीय लढती खेळण्याच्या युरोपीय विक्रमाची बरोबरी साधली. सर्वाधिक १९५ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम मलेशियाच्या सॉह चिन अ‍ॅन यांच्या नावे आहे.

 

Exit mobile version