ज्युलीने तुर्कीत ढिगाऱ्याखाली ६ वर्षांच्या बेरिनला पाहिले, रोमिओने खात्री केली आणि…

भारताच्या ऑपरेशन दोस्त मोहिमेत या श्वानांनी जबरदस्त कामगिरी केली आहे

ज्युलीने तुर्कीत ढिगाऱ्याखाली ६ वर्षांच्या बेरिनला पाहिले, रोमिओने खात्री केली आणि…

तुर्कस्तान आणि रशियामध्ये मृतांचा शोध घेता घेता बचाव पथकेही आता थकली आहेत. यंत्रेही हतबल ठरली आहेत. परंतु भारतातून बचाव मोहिमेसाठी गेलेल्या रोमिओ आणि ज्युली यांनी केलेल्या कामगिरीने येथील सर्वच जण थक्क झाले आहेत. या दोन श्वानांनी सर्वत्र पसरलेल्या ढिगाऱ्यातून एका सहा वर्षाच्या मुलीचा जीव वाचवला आहे.

ज्युली आणि रोमियो या दोन्हा श्वानांचे खूप कौतुक करण्यात येत आहे. एनडीआरएफची पथक तुर्कीच्या नुरदगी भागात मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे. त्यांच्याच जोडीला ज्युली आणि रोमियो देखील या मोहिमेमध्ये व्यस्त होत्या. इतक्यात ज्युलीने ढिगाऱ्याच्या एका ठिकाणी भुंकायला सुरुवात केली.

ज्युलीला ढिगाऱ्यात कोणीतरी जिवंत आहे याची जाणीव झाली आहे असे एनडीआरएफच्या जवानांना समजले. रोमियोलाही त्या ठिकाणी पाठवण्यात आले. त्यावेळी दोघानींनी भुंकायला सुरुवात केली. यानंतर एनडीआरएफच्या जवानांना ढिगाऱ्यात कोणीतरी जिवंत आहे याची खात्री पटली. यानंतर जवानांनी त्याच ठिकाणी काळजीपूर्वक ढिगारा हटवण्यास सुरुवात केली, तेव्हा तेथून एक सहा वर्षांची मुलगी जिवंत सापडली. सहा वर्षीय बेरेन असे या मुलीचे नाव आहे.

सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३४ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपानंतर लगेचच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, एनडीआरएफच्या दोन तुकड्या सर्व आवश्यक उपकरणांसह आणि चार स्निफर डॉगची मदत आणि बचाव कार्यासाठी तुर्कीला पाठवण्यात आल्या. भारतीय लष्कराच्या जवानांना तुर्कस्तानलाही पाठवण्यात आले आहे, जिथे ते फील्ड हॉस्पिटल बांधून भूकंपग्रस्तांवर उपचार करत आहेत.

अमित शह यांनीही केले कौतुक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून सहा वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल एनडीआरएफचे कौतुक केले आहे.

Exit mobile version