रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…

रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…

अमेरिकन ओपनमध्ये स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे.

रॉजर फेडररला मागील काही काळात गुडघेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे फेडररच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्याला काही महिने टेनिस कोर्टाच्या बाहेर राहावे लागणार आहे. त्याच्या या शस्त्रक्रियेमुळे तो अमेरिकन ओपनला मुकणार आहे. त्यानंतरही फेडररची टेनिस कोर्टवर परतण्याची अपेक्षा फारच कमी आहे. फेडररवर मागील वर्षी दोनदा शस्त्रक्रिया झाली होती. यंदाही तो केवळ १३ सामने खेळू शकला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळेच फेडररला टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेणे भाग पडले होते. त्याआधी तो फ्रेंच ओपनलाही मुकला होता.

रॉजर फेडररने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ मेसेज शेअर केला आहे. याच व्हिडीओतून रॉजर फेडररनं अमेरिकन ओपनमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. रॉजर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे की, “मी अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतला. ग्रासकोर्ट सत्र आणि विम्बल्डन दरम्यान माझ्या गुडघ्याचं दुखणं आणखी वाढलं. त्यांनी मला आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मी सुद्धा त्यांचा सल्ला मानण्याचं ठरवलं. त्यामुळे मला काही महिने टेनिस कोर्टपासून दूर राहावं लागेल.”

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यास सुरूवात

अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!

मला काही महिने काठीचा आधार घेऊन चालावे लागणार आहे. त्यामुळे मला टेनिसपासून लांब राहावे लागणार आहे. परंतु मला पुन्हा खेळायची आशा आहे. माझ्या वयात शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणे अवघड असणार आहे याची मला कल्पना आहे. पण मी प्रयत्न करणार आहे. मला तंदुरुस्त बनून पुन्हा खेळायचे आहे, असे मत वीस वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेल्या फेडररने व्यक्त केले.

फेडररला याआधीच्या दोन शस्त्रक्रियांमुळे जवळपास वर्षभर टेनिस कोर्टबाहेर रहावे लागले होते. तो २०१९ साली अखेरचा अमेरिकन ओपन स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते. फेडररने २००४ ते २००८ या कालावधीत सलग पाच वेळा अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते. तसेच २००९ आणि २०१५ मध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती.

Exit mobile version