हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड

हॅरी पॉटर या चित्रपटात हॅग्रीडची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते रॉबी कोलट्रेन यांचे निधन झाले आहे.

हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड

हॅरी पॉटर या चित्रपटात हॅग्रीडची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते रॉबी कोलट्रेन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्कॉटलंडमधील फाल्किर्कजवळील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या एजंट बेलिंडा राइट यांनी दिली आहे.

हॅरी पॉटरमधील रुबियस हॅग्रिड हे त्यांचं पात्र हे प्रेक्षकांना फारच भावलं होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांच्या पसंतीचं हे पात्र होतं. हॅरी पॉटर सोबतच त्यांनी इतरही बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. जेम्स बॉन्डच्या ‘गोल्डनआय’ आणि ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ या दोन्ही चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

कोलट्रेन यांच्या निधनाबाबत हॅरी पॉटरच्या लेखिका जेके रोलिंग यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली दिली आहे. तसेच त्यांचे वर्णन ‘इनक्रेडिबल टॅलेंट’ आणि ‘परिपूर्ण’ अशा शब्दांत केले आहे. अनेकांनी कोलट्रेन यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

कोलट्रेन हे मूळचे स्कॉटिश स्टार असून त्यांचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन असे आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये दक्षिण लॅनार्कशायरच्या रुदरग्लेन येथे झाला. ‘प्ले फॉर टुडे’ या टीव्ही मालिकेतून १९७९ मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती. १९८७ मध्ये त्यांनी ‘स्कॉटिश रॉक अँड रोल’, ‘बँड द मॅजेस्टिक्स’च्या टुटी फ्रुटीमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह जाणार?

मोटारीतून प्रवास करणाऱ्यासाठी सिलबेल्ट सक्ती

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर

२००६ च्या नवीन वर्षाच्या सन्मान यादीत कोल्ट्रेन यांना त्यांच्या नाटकातील सेवांसाठी ओबीई बनवण्यात आले होते तसेच २०११ मध्ये चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ‘बाफ्टा स्कॉटलंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Exit mobile version