24 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरदेश दुनियाबापरे!! ठाणे पोलिस आयुक्तालयाजवळ अपघातांची 'हद्द' झाली

बापरे!! ठाणे पोलिस आयुक्तालयाजवळ अपघातांची ‘हद्द’ झाली

Google News Follow

Related

ठाणे शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांची अवस्था दयनीय आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४४७ अपघात झाले असून ११५ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. शहरातील अपघातांमध्ये २३८ जण गंभीर जखमी झाले आहेत तर १५५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासावर निर्बंध लादण्यात आले, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला. रस्त्यावरील खड्डे तसेच जागोजागी सुरू असलेली मेट्रोची कामे यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील वाढलेल्या वाहतुकीमुळे अपघात वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वतःची चूक नसतानाही अनेक लोकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणे, नशेमध्ये वाहन चालवणे, रस्त्यावरील खड्डे यामुळे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?

पर्यावरण संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्पुरते मुरूम किंवा बारीक खडीने बुजवले जातात. पावसाची मोठी सर आल्यावर ही बारीक खडी पुन्हा रस्त्यावर पसरून त्यामुळे अपघात होत आहेत. खड्ड्यांमध्ये गाड्या आपटूनही अपघात होत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे शहर, भिवंडी, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसर येतो. या परिसरातून जानेवारी ते जुलै महिन्यात ४४७ अपघातांची नोंद झाली आहे.

पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढते. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरलेले असतात त्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज विशेषतः दुचाकीस्वारांना येत नाही आणि या खड्ड्यात वाहने आपटून अपघात होतात. खड्डे बुजवण्यासाठी संबंधित यंत्रणांना अनेकदा सांगितले आहे, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा