पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वकार युनूसने सोमवारी एका वृत्तवाहिनीवरील टॉक शो दरम्यान सांगितले की, टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवानने हिंदूंसमोर नमाज पठण केले ही घटना त्यांच्यासाठी खूप खास होती. युनूस यापूर्वी संघाचा मुख्य प्रशिक्षकही होता.
वकार युनूसने पाकिस्तानी सलामीवीरांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि सामना संपेपर्यंत शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिले त्याचे कौतुक केले. तो म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभवाचा इतिहास आहे, ज्यामुळे सट्टेबाजांचा असा विश्वास होता की भारत १५१ धावा करूनही सामना जिंकू शकेल.
वकार युनूस म्हणाला, “बाबर आणि रिझवान यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, समजूतदार तरीही आक्रमक, स्ट्राइक-रोटेशन, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, ते आश्चर्यकारक होते. सर्वात चांगली गोष्ट, रिजवानने जे केले, ‘माशाल्ला’, त्याने हिंदूंनी वेढलेल्या जमिनीवर नमाज अदा केला, ती माझ्यासाठी खरोखरच खूप खास गोष्ट होती.”
यापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी हा ‘मुस्लिम जगाचा विजय’ असल्याचे म्हटले होते. “मला या शानदार विजयाबद्दल संपूर्ण पाकिस्तानचे अभिनंदन करायचे आहे. आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला धीटपणा, दृढनिश्चय आणि धैर्याच्या अनुकरणीय प्रदर्शनात पराभूत केल्याबद्दल मी पाकिस्तान संघाला सलाम करतो. पाकिस्तानने मुस्लिम जगतासमोर आपली धार्मिकता दाखवून दिली आहे. मंत्रिपदाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही असा हा एकमेव भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे,” असं ते म्हणाले.
“पाकिस्तानी संघाला भारतातील मुस्लिमांसह जगातील सर्व मुस्लिमांचा भावनिक पाठिंबा होता. हा मुस्लिम जगताचा विजय आहे. पाकिस्तान झिंदाबाद. इस्लाम झिंदाबाद,” असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
नवाब मालिकांविरोधात फौजदारी गुन्हा?
अमरिंदर सिंग उद्या नवीन पक्षाची घोषणा करणार?
कोवॅक्सिनला २४ तासात मिळणार डब्ल्यूएचओची मान्यता
भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
सामन्यापूर्वी, शोएब अख्तरने एका टॉक शोमध्ये हरभजन सिंगने ‘आम्ही एक आहोत’ अशी टिप्पणी केल्यानंतर दोन राष्ट्रांच्या सिद्धांतावर (Two Nation Theory) विश्वास असल्याचे प्रतिपादन केले होते.