ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल; पोहचताच व्यक्त केल्या भावना

ऋषी सुनक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेणार

ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल; पोहचताच व्यक्त केल्या भावना

इस्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्धाला आता १० दिवसांहून अधिक दिवस झाले असून या दिवसांमध्ये इस्रायल आणि गाझा पट्टीतल्या हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या युद्धामध्ये अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी इस्रायलचा दौरा करून या युद्धात आपण इस्रायलच्या बाजूने उभे आहोत असा संदेश दिला. तसेच, गाझा पट्टीतली परिस्थिती सुधारावी यासाठी मध्यस्थी केली. त्यापाठोपाठ गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.

इस्रायलमध्ये पोहोचताच ऋषी सुनक म्हणाले, आम्ही इस्रायलबरोबर उभे आहोत. सुनक यांच्यासह जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सुनक यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, मी इस्रायलमध्ये आहे. हे राष्ट्र शोकसागरात बुडालं आहे. मीसुद्धा तुमच्या दुःखात सहभागी आहे. दहशतवादाविरोधात मी तुमच्याबरोबर उभा आहे, यापुढेही मी तुमच्याबरोबर असेन.

हे ही वाचा:

ललित पाटीलच्या दोन महिला साथीदारांना अटक

हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिसांना मॅनेज करण्यासाठी ललित पाटील देत होता पैसे

थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?

पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी

ऋषी सुनक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेणार आहेत. ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये गाझा पट्टी आणि इस्रायलमधील संपूर्ण परिस्थितीवर चर्चा होईल. इस्रायलच्या भूमीवरून ऋषी सुनक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतील. तसेच या युद्धात जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतील. या युद्धामुळे सामान्य नागरिकाचा मृत्यू होणं ही मोठी हानी आहे, यावर ऋषी सुनक भाष्य करतील, असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version