कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच केंद्राने मोफत धान्य योजना सुरु केली. जेणेकरून किमान अन्नाचा मुख्य प्रश्न मिटावा. परंतु या रेशनवरील धान्याचा काळाबाजार हा अनेक ठिकाणी सुरु झालेला दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्येही हा काळा बाजार फार मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून उघड होत आहे.
पालघर मधील डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील ग्रामीण भागातील रेशन दुकानातील तांदुळ आता दलालांना विकला जात आहे. राजरोसपणे ही विक्री सुरू असून, तब्बल १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने हा तांदूळ विकला जात आहे. मुख्य म्हणजे उत्तम प्रतीचा हा तांदूळ फिल्टर करून नंतर तो बाजारामध्ये जवळपास ८० ते ८५ रुपये भावाने विकला जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आलेली आहे.
रेशनवरील धान्यावर दलालांची नजर ही फार पूर्वीपासूनच आहे. परंतु या गोष्टीला कुठेही लगाम घातलेला दिसत नाही. कुटूंबातील व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे काही कुटूंबात अधिक धान्य मिळते. अशावेळी दलाल हे धान्य विकत घेऊन बाजारात अधिक चढ्या भावाने विकतात.
तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटूंबांना ३५ किलो धान्य मोफत देण्यात येते. हे सर्व मोफत मिळणार गहू तांदूळ विकत घेण्यासाठी ऱॅकेट आता पालघरमध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहे. गरींबाकडून कमी किमतीत तांदूळ घेऊन तो जास्त पैसे लावून बाजारात विकला जात आहे.
हे ही वाचा:
‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’
अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती
नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल
कोरोनामुळे रोजगार गेल्यामुळे केंद्राने धान्य मोफत देण्याची तरतूद केली. परंतु या धान्याचा वाढता काळाबाजार होत असल्याने आता अधिक डोकेदुखी झालेली आहे.