ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही निर्बंध घातले होते. परंतु आता मात्र या नियमांमध्ये हळूहळू शिथिलता येत आहे. आरोग्य मंत्रालयाने १४ फेब्रुवारीपासून लागू होणार्या आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या काही देशांना भारताने जास्त जोखीम असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकले होते. परंतु आता मात्र जोखीम असलेल्या देशांची श्रेणी तसेच अन्य देश असा फरक नसणार आहे. आधीच्या नियमांप्रमाणे प्रवासानंतर सात दिवस होम क्वारंटाईन होणं अनिवार्य होते. परंतु आता त्याऐवजी १४ दिवस स्व-निरीक्षणाची शिफारस केली गेली आहे.
Ministry of Health issues revised guidelines for international arrivals, to come in effect from 14th Feb
The demarcation of countries ‘at-risk’ & other countries removed.
Recommends 14 days self-monitoring post-arrival as against 7 days home quarantine as was mandated earlier. pic.twitter.com/oPJBKwCkak
— ANI (@ANI) February 10, 2022
परदेशातून भारतात येऊ पाहणाऱ्यांना तिकीट देण्यापूर्वी येथील कोविड नियमांची माहिती द्यावी अशा सूचना संबंधित एअरलाईन्स तसेच ट्रॅव्हल एजन्सीजना दिल्या गेल्या आहेत. विमान पायलट आणि क्रू मेंबर्सनाही कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाला कोविड लक्षणे आढळली तर कोविड प्रोटोकॉलनुसार त्याची माहिती द्यावी लागणार असून त्याला आयसोलेट केलं जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने १४ फेब्रुवारीपासून लागू होणार्या आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
हे ही वाचा:
WWE सुपरस्टार ग्रेट खली भाजपामध्ये
मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज
सोनिया गांधींनी दीड वर्ष घराचे भाडेच भरले नाही
अशक्य केले शक्य!…पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री योगींचे भरभरून कौतुक
नव्या नियमांनुसार, ज्यांना भारतात यायचे असेल, त्यांना सुविधा पोर्टलवर जाऊन मागील १४ दिवसांची माहिती तसेच इतर काही माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना ७२ तासांपूर्वी RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही अपलोड करावे लागणार आहे.