सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी वसाहत असलेल्या वांद्रे शासकीय वसाहतीतील इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वसाहतीच्या ९२ एकर जागेत पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात २,१२० घरे बांधण्यात येत आहेत. मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या प्रभावामुळे वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम पूर्णतः बंद होते, त्यामुळे आता २०२२ पर्यंत घरांचे काम पूर्ण करणे सार्वजनिक विभागासाठी अवघड झाले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी १४ इमारती बांधण्यात येणार असून यात ५,१२० घरे आहेत. या १४ इमारतींपैकी १२ इमारतींच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील २,१२० घरांपैकी ४५० घरांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील घरे मे २०२२ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सामान्य प्रशासनाला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. ही घरे चतुर्थ श्रेणीसाठी आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन हजार घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?
१४ पैकी उर्वरित दोन इमारतींच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. या दोन्ही इमारती १६ ते १८ मजली असून यातील घरे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत.