भारत देश जेव्हा मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत होता. तेव्हा लंडनमधील काहींना मात्र मोदी विरोधाची जळजळ होताना दिसत होती. रविवार १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनी लंडनमध्ये साऊथ एशिया सोलिडेरिटी या संस्थेमार्फत ‘रिजाइन मोदी’ अर्थात पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचे बॅनर झळकवले गेले.
लंडनमधील प्रसिद्ध अशा वेस्टमिन्स्टर ब्रिजवर हे बॅनर फडकवण्यात आले. तर लंडनमधील भारतीय दूतावासाच्या बाहेर मेणबत्त्या पेटवून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारतात घडलेल्या हिंसेच्या घटनांचा आणि त्यात प्राण गमावलेल्या लोकांचा दाखला देण्यात आला.
हे ही वाचा:
राज्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला कोरोनाची लागण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ
साऊथ एशिया सोलिडेरिटी या संस्थेच्या ट्विटर हँडल वरून यासंबंधी पोस्ट केल्याची दिसत आहे. ‘लंडनमध्ये आजची पहाट झाली, तेव्हा लंडनमधील काही भारतीय आणि भारताचे मित्र यांनी ‘रिजाइन मोदी’ असे मोठे बॅनर झळकावल्याचे’ ट्विटमध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे भारताच्या महत्त्वपूर्ण अशा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाला गालबोट लावण्यासाठी परकीय शक्ती सक्रिय झाल्या का? असा सवाल विचारला जात आहे. या संस्थेने मोदी विरोधासाठी पुढे केलेली कारणे ही देखील जुनीच चोथा झालेली कारणे आहेत. त्याच्यावरून गेले अनेक वर्ष मोदींना व्यक्तिगतरित्या टार्गेट केले आहे.