अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. पुणे तेथे काय उणे असे म्हणूनच म्हटले जाते. पुण्यामध्ये अडीच लाख वर्षांपूर्वी अश्मयुगीन काळात मानवी वस्तीच्या पाऊलखुणा सापडलेल्या आहेत. तसेच आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. आदिमानवाने तयार केलेली हत्यारे सापडल्यामुळे या संशोधनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंतचा समज होता. पण या संशोधनानं कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व होतं हे सिद्ध झालं आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅंड रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक यावर गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील प्लेइस्टोसिन काळातील मानवी संस्कृती शोध घेण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. संशोधनाच्या माध्यमातून मानवी अस्तित्व नव्हते असे वाटत होते. परंतु बेसाल्टचा दगड अश्मयुगीन काळात हत्यार बनवण्यासाठी वापरला जात होता. त्यामुळेच आता मानवी वस्ती असल्याचे स्पषट झालेले आहे. त्यामुळेच आता या संशोधनातील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

जयेंद्र जोगळेकर यांनी हे संशोधन केलेले आहे. पुणे जिल्ह्यातील बोरी व उरमोडी नदीनजीक शहापूर, वेचले, वळसे, माजगाव, अतीत, निसराळे आणि कृष्णा नदीजवळ मेणवली या ठिकाणी मानवी संस्कृतीचे अस्तित्व आढळले आहे. जोगळेकर २०१४ पासून या विषयावर काम करत आहेत.

महाराष्ट्रामध्ये अश्मयुगीन संशोधनाची सुरुवात १८६५ मध्ये झाली. त्याचवेळी गोदावरी काठी दगडी चिलका हत्यारांचा शोध लागला. गेल्या चाळीस वर्षातील संशोधनामुळे महाराष्ट्रातील नद्यांच्या काठी पूर्व अश्मयुगीन संस्कृतीचा पुरावा प्रामुख्याने दगडाच्या स्वरुपात आढळून येत आहे. मुळा, प्रवरा, गोदावरी, तापी, गिरणा, मुळा-मुठा, घोड, कुकडी, पूर्णा, कृष्णा, पैनगंगा, कोलारी या नद्यांच्या काठी अश्मयुगीन हत्यारांचे अवशेष आढळले.

हे ही वाचा:

दिल्ली गँगवॉरमागे गोगी – टिल्लू गॅंगचे हाडवैर

आता श्वानपथक लागणार दारूच्या मागे!

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

राज्य सरकारची मागणी फेटाळली; जिल्हा परिषद निवडणुका ठरल्याप्रमाणेच…

 

कृष्णेच्या उगमानजीक अश्मयुगीन मानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंत समज होता. तसंच, बेसाल्टचा दगड अश्मयुगीन काळात हत्यारं बनवण्यासाठी योग्य नाही, असा ही समज होता. हे दोन्ही समज या संशोधनानं खोडून काढले आहेत.

Exit mobile version