कर्तव्यपथावरील परेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान’ करणारा महाराष्ट्रा चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. एकूण १७ राज्यांच्या चित्ररथामध्ये उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर , महाराष्ट्रचा चित्ररथ दुसऱ्या आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर आधारित आपला चित्ररथ होता. या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. संबळ हे गोंधळींचं प्रमुख वाद्य आहे ते संबळ या ठिकाणी दाखवलेलं होते. हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहेत. त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, माहूरची आणि वणीची सप्तशृंगी देवी असे या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. पोतराजसुद्धा चित्ररथाच्या बाजूला होते. एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार
चित्ररथांमध्ये उत्तराखंडने पहिल्या क्रमांक पटकाविला तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने तिसरे स्थान मिळविले. उत्तराखंडच्या चित्ररथात तेथील देवभूमीचे दर्शन झाले तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून प्रभू श्रीरामाचे दर्शन घडले. एकूणच कर्तव्यपथावर चाललेल्या चित्ररथांनी लोकांचे लक्ष वेधले.