26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाहिंदू धर्म, गाय, देवीदेवतांवरून ब्रिटनच्या शाळांत हिंदू विद्यार्थ्यांचा छळ, अपमान

हिंदू धर्म, गाय, देवीदेवतांवरून ब्रिटनच्या शाळांत हिंदू विद्यार्थ्यांचा छळ, अपमान

हेन्री जॅकसन सोसायटीने तयार केलेल्या अहवालात उघड झाल्या भयंकर बाबी

Google News Follow

Related

ज्या ब्रिटनने भारतावर दीडशे वर्षे राज्य केले पण त्यांनी हिंदुत्व, हिंदू धर्म याबाबत त्यांना कसलेही आकलन नाही. ब्रिटनमधील शाळांत तर हिंदू मुलांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून त्यांचा हिंदू धर्मातील प्रथा परंपरा, पावित्र्य, देवीदेवता यावरून छळ करण्यात येत असल्याचे समोर येते आहे. हेन्री जॅकसन सोसायटीने केलेल्या एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की, ब्रिटनमध्ये हिंदुत्वाबद्दल, हिंदू धर्माबद्दल, देवीदेवतांबद्दल, प्रथा परंपरांबद्दल अत्यंत चुकीची माहिती दिली जात असून त्यांना सातत्याने अपमानित करण्यात येत आहे.

या अहवालात म्हटले आहे की, अनेक देवीदेवतांची पूजा करत असल्याबद्दल हिंदू मुलांना खिजवले जात आहे. मुस्लिम मुले या हिंदू मुलांना काफीर म्हणत आहेत तर गाईला पवित्र मानण्यात येत असल्याबद्दलही हिंदू मुलांची खिल्ली उडविली जात आहे. देशातील जातीव्यवस्थेसाठी किंवा चुकीच्या सामाजिक संकल्पनांसाठी या हिंदू मुलांना जबाबदार धरले जात आहे.

चार्लोट लिटलवूड या अहवालाच्या लेखिका असून ९९८ हिंदू पालकांशी संवाद साधून त्यातून अहवाल तयार करण्यात आला आहे. या पालकांच्या तक्रारी आहेत की, शाळांमध्ये ब्रिटिश शाळांमध्ये हिंदुत्वाबद्दल जे काही शिकविले जाते त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. अब्राहमिक चष्म्यातून हिंदुत्व पाहिले जाते. त्यातून हिंदू विद्यार्थ्यांना डिवचण्याचे प्रकार होतात.

एका पालकाने म्हटले आहे की, हिंदू धर्माविषयी जे प्रशिक्षण दिले जाते त्यात हिंदुत्वाची थट्टा उडविली जाते. ब्रिटिशांनी भारतावर ४०० वर्षे राज्य केले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही माहीत नाही. त्यांना आपल्या देवीदेवतांबद्दल ज्ञान नाही. त्याचा फटका आमच्या मुलांना बसतो आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठार

अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

म्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले…

हिंदू मुले शाकाहारी असल्याबद्दल त्यांना त्रास सहन करावा लागतो. एका मुलीच्या अंगावर गाईच्या मांसाचा तुकडा फेकण्यात आला तर एका मुलाला इस्लामचा स्वीकार केला तर हा छळ थांबेल असेही एका मुस्लिमाने सांगितले.

एका पालकाने या अहवालात म्हटले आहे की, एका हिंदू मुलाला एका मुस्लिम मुलाने विचारले की, तुम्ही आमची मशीद का तोडली? काहींनी माझ्या मुलाला झाकीर नाईकचे व्हीडिओ पाहण्यास सांगितले. कारण हिंदुत्वाला काही अर्थ नाही, असे त्यांचे म्हणणे होते. एका ख्रिस्ती विद्यार्थ्याने हिंदू विदयार्थ्याला सांगितले की, आमचा येशू तुमच्या देवांना नरकात पाठवेल.

या सगळ्या छळामुळे अनेक विद्यार्थी शाळांमध्ये जाण्यास तयार नाहीत. एका प्रकरणात सती प्रथा ही हिंदुत्वाचा एक भाग असल्याचे शिक्षक शिकवतात असे समोर आले आहे. तसेच स्वस्तिक चिन्ह हिंदुत्वाचा भाग असल्यामुळे हिंदू मुलांवर ‘नाझी’ असल्याचा शिक्का मारला जात आहे. एका शिक्षिकेने तर म्हटले की, हिटलर हा भारतातील जातीव्यवस्थेमुळे प्रेरित झाला. तसेच मुलांना असेही शिकवले जाते की, हिंदू ३३० दशलक्ष देवांना पूजतात.

गेल्या वर्षी इंग्लंडमधील लिस्टर येथे मंदिरांवर हल्ले झाले. ते हिंदुत्वाबद्दलच्या अशाच चुकीच्या माहितीमुळे झाल्याचे समोर येते आहे. तुरुंगातही ही समस्या दिसते आहे. तिथे २५ ख्रिस्ती कैद्यांनी तुरुंग व्यवस्थापनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे कारण इस्लामी कैद्यांच्या गँगपासून त्यांना संरक्षण हवे आहे. या तुरुंगातील अधिकारी इस्लामी कैद्यांना सगळ्यांवर नियंत्रण मिळविण्याची मुभा देतात कारण तसे न केल्यास भेदभाव केल्याचा आरोप होऊ शकेल, असे त्यांना वाटते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा