अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्या ठिकाणी अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळात तालिबानने अफगाणिस्तानचे अधिकृत नाव बदलले आहे. अजूनही तालिबानच्या सरकारला अधिकृत मान्यता मिळालेनी नाही.
तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाचे नाव बदलले आहे. त्यांनी अफगाणिस्तानचे नाव बदलून अफगाणिस्तानची इस्लामी अमिराती (इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान) असे केले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीलुल्लाह मुजाहिद यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
له انګریزي ښکیلاک نه د هیواد د خپلواکي د یوسل او دویمې کلیزې په مناسبت د افغانستان إسلامي امارت اعلامیهhttps://t.co/HfZUIHnCJp pic.twitter.com/jQViMYERpW
— Zabihullah (..ذبـــــیح الله م ) (@Zabehulah_M33) August 19, 2021
तालिबानचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर तेथील नागरीकांवर पळ काढण्याची वेळ आली आहे. महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी प्रेस कॉन्फरन्सदरम्यान म्हटलं की, आता अफगाणिस्तान मुक्त करण्यात आलं आहे. गेल्या सरकारनं महिलांवर अनेक निर्बंध लादले होते. पण आता तालिबान्यांच्या शासनकाळात महिलांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. मुजाहिदनं दिलेल्या माहितीनुसार, महिलांना इस्लामी कायद्याच्या मानदंडांचं पालन करुन अधिकार दिले जातील. महिलांना आरोग्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येईल.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबानने का सुरक्षा पुरवली? वाचा सविस्तर…
विमानांच्या संरक्षणासाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान
बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
दरम्यान तालिबान पूर्वीप्रमाणे न वागता आता लोकशाही प्रस्थापित करेल अशी खुळी आशा बाळगणाऱ्या लोकांचा अपेक्षाभंग तालिबानने केला आहे. “अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था नसेल, इथे फक्त शरिया कायदा असेल. आमच्या देशात लोकशाहीची पाळंमुळं नाहीत.” असं वक्तव्य वाहीदुल्लाह हाश्मीने केले आहे. तालिबानबाबत “तालिबानवर विश्वास केला जाऊ शकत नाही. ते आत्ता काहीतरी बोलतील आणि नंतर त्यांना हवं तेच करतील.” असं वक्तव्य खुद्द खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नातीने केले आहे.