इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय

इम्रान खान यांची अटक बेकायदा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली

इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय

इम्रान खान यांची अटक बेकायदा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली असली तरी त्यांचे राजकीय भवितव्य अंध:कारमय असल्याचे बोलले जात आहे.

इम्रान खान हे सातत्याने लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. लष्कराकडून सातत्याने आपल्याविरोधात कट आखला जात आहे, माझ्या हत्येचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप ते करत आहेत. मात्र लष्कराविरोधात पाऊल उचलल्यामुळे ते संकटांचीच पायाभरणी करत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य, सार्वजनिक प्रतिमा आणि त्यांच्या राजकीय पक्षाचे अस्तित्व आता त्यांचे राजकीय विरोधक आणि लष्करावर अवलंबून आहे.

इम्रान खान यांची वाढती लोकप्रियता

इम्रान खान यांचे सर्वांत सशक्त हत्यार म्हणजे त्यांची वाढती लोकप्रियता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या पक्षात दुसऱ्या स्थानाचा नेताच तयार होऊ शकलेला नाही. हेच बळ त्यांचा कच्चा दुवा ठरत आहे. कारण त्यांच्या राजकीय विरोधकांना त्यांना एकट्यालाच सामोरे जावे लागणार आहे आणि भविष्यातील संकटांशी एकट्यानेच सामना करावा लागणार आहे,’ असे वरिष्ठ राजकीय विश्लेषक जावेद सिद्दीकी सांगतात.

इम्रान यांचे राजकीय भवितव्य आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा कट आहे. ‘त्यांना इम्रान खान यांची हत्या घडवायची नाही. परंतु त्यांना तीच चूक दोनदा करायची नाही. इम्रान खानविषयी त्यांचे चांगले मत नाही आणि इम्रान यांच्याकडेही दोषारोप घेण्यासाठी तेच एकमेव आहेत,’ असे एका सूत्राने सांगितले.

‘द मायनस वन’ फॉर्म्युला

याआधी सरकारने ‘मायनस-१’ हा फॉर्म्युला अवलंबण्याचा प्रयत्न केला. ज्यानुसार, त्यांना इम्रान खान यांना राजकीय शर्यतीतूनच बाहेर काढायचे होते आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ पक्षाला एक छोटा राजकीय पक्ष म्हणून सीमित करायचे होते. मात्र आता त्यांनी ही योजना बदलली आहे. मात्र आता त्यांच्या दुय्यम नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्याला लक्ष्य करायचे आहे. जेणेकरून ते इम्रान खान यांना एकटे पाडतील आणि त्यांना त्यांच्या टीमशिवायच राजकीय पक्ष चालवावा लागेल.

‘पीटीआय वजा इम्रान खान हा पर्याय अवलंबला गेला आहे… मात्र तो उलटला. इम्रान खान आता एकटे पडले आहेत. त्यांना कोणताही पाठिंबा नाही. ना नेतृत्व आहे, ना टीम. ते ४८ तास कोठडीत होते आणि ते त्यांचे सर्वांत वाईट दु:स्वप्न ठरले. यावेळी त्यांना कळून चुकले असेल की ते केवळ एक व्यक्ती आहेत आणि देश त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे,’ असे या सूत्राने सांगितले.

इम्रान खान यांचे सहकारी पुढील किमान १४ दिवस तुरुंगात राहतील. मात्र खान यांच्यावर सुमारे १५० हून अधिक केसेस दाखल आहेत. त्यामुळे यातून त्यांची सध्या तरी सुटका होणे मुश्कील दिसते आहे. त्यांना एकटेच न्यायालयासमोर सादर करण्यात आले आणि तेही ज्यांच्यावर ते सातत्याने स्वत:च्या हत्येचा कट आखण्याचा आरोप करत आहेत, त्या लष्कराच्या बंदोबस्तात. त्यांना या वास्तवाशी सामना करावाच लागेल.

हे ही वाचा:

“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”

वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!

“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”

सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींची बाजी

इम्रान यांचे पंख छाटणार

इम्रान खान यांना जनतेचा मिळत असलेला पाठिंबा एका झटक्यात दूर करू शकत नाही, मात्र इम्रान यांचे पंख कापून, त्यांची राजकीय गणिते, त्यांचे राजकीय हेतू यांची धार कमी करता येऊ शकते. तसेच, त्यांना शारीरिक रूपात जिवंत ठेवून त्यांच्या सहकाऱ्यांनाही शांत ठेवता येऊ शकेल, अशी रणनीती आखली जात आहे. इम्रान खान यांच्या राजकीय पक्षाचे अस्तित्व नष्ट करण्याचाही विचार दुसरीकडे सुरू आहे. किमान इम्रान यांचे नाव पक्षापासून दूर काढण्याचा प्रयत्न आहे. पक्षप्रमुख म्हणून इम्रान खान यांना अपात्र ठरविण्यासाठी कायदेशीर बाजू तपासल्या जात आहेत. असे झाल्यास इम्रान यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येईल आणि त्यांच्यावरील भ्रष्टाचार आणि अन्य गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावण्यांत त्यांना अडकवून ठेवले जाईल.

Exit mobile version