रिलायन्स उद्योगसमुहाने इस्रायलच्या ब्रेथ ऑफ हेल्थ या कंपनीशी केलेल्या दीड कोटी डॉलरच्या करारामुळे या कंपनीचे एक शिष्टमंडळ भारतात येऊन करोना चाचण्यांचे प्रशिक्षण देणार आहेत. या नव्या तंत्रामुळे करोनाचे निदान अगदी कमी वेळेत करणे शक्य होणार आहे.
हे ही वाचा:
बायडेन प्रशासनाची भारताला मदत अमेरिकेच्या फायद्यासाठी?
वादग्रस्त पोलिस अधिकारी दया नायक यांची बदली
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
रिलायन्सच्या विनंतीमुळे या शिष्टमंडळाला भारतात येण्याची विशेष परवानगी मिळाली आहे. खरे तर, इस्रायलने भारतासह सात देशांचा प्रवास करण्यास आपल्या नागरिकांना परवानगी नाकारलेली आहे. पण या शिष्टमंडळाच्या माध्यमातून रिलायन्सच्या पथकाला मार्गदर्शन केले जाईल. ज्यामुळे करोनाचे निदान करणारी नवी पद्धती उपयोगात येईल.
रिलायन्सने या कंपनीशी जानेवारीत केलेल्या करारानुसार या कंपनीकडून दीड कोटी डॉलरची सामुग्री विकत घेतली जाईल. त्यातून लाखो लोकांच्या चाचण्या करणे शक्य होणार आहे. ब्रेथ ऑफ हेल्थने ही एक अशी यंत्रणा तयार केली आहे, ज्या द्वारे करोनाचे निदान अगदी झटपट करणे शक्य आहे. नेहमीच्या पीसीआर चाचणीपेक्षाही ही चाचणी ९८ टक्के अचूक निदान करू शकते, असा दावा केला जात आहे. प्राथमिक स्वरूपाची चाचणी इस्रायलच्या हदासा मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आली. ही सामुग्री भारतात पोहोचली असून त्यातून करोनाशी सुरू असलेल्या लढाईला बळ मिळणार आहे.