भारताच्या तांदूळाच्या निर्यातीला बळ देण्यासाठी लाल तांदूळाच्या निर्यातीची पहिली खेप अमेरिकेला रवाना झाली आहे.
लोहाने युक्त असलेल्या ब्रम्हपुत्रा खोऱ्याचे वैशिष्ट्य असलेल्या ‘लाल तांदूळाचे’ उत्पादन कोणत्याही रासायनिक खताच्या वापराशिवाय घेण्यात आले आहे. आसामचे प्रमुख अन्न असलेल्या या लाल तांदूळाला या भागात बाओ- धान या नावाने ओळखले जाते.
हे ही वाचा:
या तांदूळाची निर्यात भारतातील आघाडीेचे अन्नपदार्थ निर्यातदार एलटी एक्सपोर्टर यांच्याकडून निर्यात केली जात आहे. या निर्यातीच्या पहिल्या खेपेला ऍग्रिकल्चरल ऍंड प्रोसेस्ड फुड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (एपीईडी), सोनिपत हरियाणा अध्यक्ष डॉ एम अंगमुथू यांच्या हस्ते करण्यात आले.
या लाल तांदूळाची निर्यात वाढल्यास ब्रम्हपुत्रा पूरक्षेत्रातील तांदूळ उत्पादक कुटुंबांना फायदा होणार असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे.
एपीईडीच्या अंतर्गत सरकारने राईस एक्सपोर्ट प्रमोशन फोरमची (आरईपीएफ) स्थापना केली असून, त्यामार्फत विविध उपायांद्वारे सरकारचा तांदूळ निर्यात वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे.
एप्रिल- जानेवारी २०२०-२१ या काळात भारताच्या बासमती व्यतिरिक्त इतर तांदूळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. या काळात बासमती व्यतिरिक्त तांदूळांची सुमारे ₹२६,५०० कोटींची निर्यात करण्यात आली आहे. बासमती व्यतिरिक्त तांदूळांच्या निर्यातीत ११५ टक्क्यांची वाढ झाली आहे.