मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

३१ डिसेंबरच्या रात्री हिंदू मंदिरांची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. हिंदू धर्मात ज्या गाईला मातेचा दर्जा दिला जातो आणि पवित्र मानले जाते त्या गाईंची कत्तल करून मंदिराच्या दरवाज्यात गोमांस लटकावण्याचा चिथावणीखोर प्रकार घडला आहे. भारताचा शेजारी असलेल्या बांग्लादेशमध्ये हा प्रकार घडला आहे. या कृत्यातून दंगल पसरवून समाजातील शांतता बिघडवण्याचा आणि समाजातील तेढ वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे

ही घटना बांग्लादेशमधील हातिबंध उपजिल्ह्यात ही घटना घडली आहे. हातिबंध जिल्ह्यातील गेंडुकुरी गावातील तीन मंदिरांच्या दारात शुक्रवार, ३१ डिसेंबरच्या रात्री ३ पॉलिथिलिनच्या पिशव्या टांगलेल्या आढळून आल्या. या पिशव्यांमध्ये नेमके काय आहे हे पाहण्यासाठी त्या उघडून पहिल्या असता त्यात गोमांस आढळले. श्री श्री राधा गोविंद मंदिर, गेंडुकुरी कुठीपाड़ा काली मंदिर, गेंडुकुरी बट्टाला काली मंदिर अशा या तीन मंदिरांच्या दारात हे गोमांस टांगलेले सापडले.

हे ही वाचा:

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण

मुस्लीम महिलांचा लिलाव करणाऱ्या ऍपमुळे खळबळ

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

तर या सोबतच मोनिंद्रनाथ बर्मन या हिंदू नागरिकाच्या दारातही गोमांस टांगलेले आढळून आले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. हातिबंध येथील पोलिस स्थानकात एकूण चार फिर्यादी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलीस या संपूर्ण कटामागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version