भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी पुनर्विचार याचिका फेटाळली होती

भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज

मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी तो सातत्याने पळवाटा शोधत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेने आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतरही तहव्वूर राणा अजूनही न्यायालयाची दारे ठोठावत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ६ मार्च रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी त्याची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी आणखी एक याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्ता तहव्वूर राणा याने अर्ज नूतनीकरण केला आहे. या पूर्वीचा अर्ज हा न्यायमूर्ती कागन यांना उद्देशून होता आणि आता त्याने विनंती केली आहे की, नूतनीकरण केलेला अर्ज हा मुख्य न्यायाधीश रॉबर्ट्स यांच्याकडे पाठवावा, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. तसेच हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वितरित करण्यात आला आहे जे ४ एप्रिल २०२५ रोजी त्यावर विचार करतील. वितरित केलेल्या काही प्रकरणांवर सामान्यतः तपशीलवार चर्चा केली जाते, तर काही चर्चा न करता बाजूला ठेवता येतात.

तहव्वूर राणा याचे म्हणणे आहे की, त्याच्या राष्ट्रीय, धार्मिक आणि सामाजिक ओळखीमुळे भारतात त्याचा छळ केला जाईल आणि त्याला ठार केले जाईल. दहशतवादी तहव्वूर राणा याने याचिकेत म्हटले आहे की, तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे आणि पाकिस्तानी सैन्याचा माजी सदस्य आहे, ज्यामुळे त्याला कोठडीत छळ सहन करावा लागू शकतो आणि शिवाय त्याच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. राणाने असा दावा केला आहे की, त्याला पोटाचा विकार (abdominal aortic aneurysm) असून मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्याने पुढे आरोप केला आहे की, भारत सरकार हुकूमशाही करत आहे. यासाठी त्याने ह्यूमन राईट्स वॉच २०२३ वर्ल्ड रिपोर्टचा हवाला दिला आहे. ज्यामध्ये भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुस्लिमांवर भेदभाव केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

“दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल करून योग्य केले”

कोस्टल रोड येथे ३० वर्षीय तरुणाची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या

तरुणीची गळा दाबून हत्या, मृतदेह दगडाला बांधून कालव्यात फेकला, आरोपी आसिफला अटक!

भरवेगात स्कुटी चालविणाऱ्याला जाब विचारला म्हणून एकाची हत्या

अमेरिकेने तहव्वूर राणाच्या भारत प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. तसेच निर्णय जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला अत्यंत वाईट म्हटले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्याला मंजुरी मिळाली होती. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला एफबीआयने २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी- अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

सावध...बांगलादेशी घरापर्यंत पोहोचलेत ! |Mahesh Vichare | Bangladeshi Immigrants | Atul Bhatkhalkar

Exit mobile version