दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर

दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर

Uttar Pradesh, Aug 04 (ANI): The proposed model of the Ram Temple in Ayodhya on Tuesday. (ANI Photo)

दुबई येथे होऊ घातलेल्या ‘दुबई एक्सपो २०२०’ मध्ये भारत सहभागी होणार आहे. यावेळी या प्रदर्शनात भारतातर्फे अयोध्या, राम मंदिर वाराणसी घाट, योग अशा स्वरूपाची प्रदर्शनी सादर केली जाणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृतीचे दर्शन होणार आहे.

दुबई एक्सपो हे जागतिक पातळीवरचे एक अत्यंत मोठे आणि महत्त्वाचं प्रदर्शन मानले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक हे प्रदर्शन बघण्यासाठी येतात. तब्बल सहा महिने हे प्रदर्शन चालते. ज्यामध्ये अनेक देशातील उद्योगपती तसेच विविध सरकारांचा सुद्धा सहभाग असतो.

हे ही वाचा:

बजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना

पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक

अंतर्वस्त्रात रेल भ्रमंती! आमदार साहेब…हे वागणं बरं नव्हं

रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग

यंदा १ ऑक्टोबर २०२१ रोजी या प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे. तर ३१ मार्च २०२२ पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनासाठी भारताचे स्थायी स्वरूपाचे कक्ष तयार झाले असून हे एक चार मजली भवन असणार आहे. तर या सोबत एका खुल्या रंगमंचाचाही यात समावेश असणार आहे.

दुबई एक्सपो हा पाच वर्षातून एकदा येतो. या वर्षी दुबई एक्सपोमध्ये जगभरातील १९२ देश सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापैकी भारत देखील एक आहे. भारतातील विविध राज्य सरकारे यात सहभागी होणार आहेत. तर अनेक कंपन्यांचेही या एक्सपोमध्ये प्रतिनिधीत्व असणार आहे. यासोबतच सरकारचे ३० पेक्षा अधिक विभाग आपला सहभाग नोंदविणार आहेत अशी माहिती मिळत आहे. यावर्षी दुबई एक्सपोला अंदाजे अडीच कोटी लोक भेट देतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Exit mobile version