दुबई एक्स्पो २०२० ची सुरुवात १ ऑक्टोबरपासून झाली आहे. दुबई एक्स्पो हा ऐतिहासिक असून मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया प्रदेशात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच एक्स्पो आहे. दुबई एक्स्पोमधील भारताच्या पॅव्हेलियनमध्ये प्रवेश करताच तिथे अयोध्येत बनवल्या जाणाऱ्या राम मंदिराची लहान प्रतिकृती आणि अबू धाबीमधील निर्माणाधीन हिंदू मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर शहरातील पहिले असे मंदिर आहे. भारताच्या आध्यात्मिक वारशाच्या प्रदर्शनाच्या बाजूलाच भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवासाचे दर्शन होते.
दोन स्वतंत्र मजल्यांवर भारतातील उदयोन्मुख क्षेत्रे, भारताचा विकास, तर राज्य पॅव्हेलियनमध्ये गुजरात सरकारने संपूर्ण जागा व्यापली आहे. एक मजला भारताच्या कला, नृत्य आणि संस्कृतीला समर्पित आहे. जिथे मोठ्या एलसीडी स्क्रीनवर देशाचा सांस्कृतिक वारसा प्रदर्शित केला जात आहे. इंडस्ट्री पॅव्हेलियनमध्ये काही कंपन्या नवीन ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि नवीन व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी सहभागी आहेत.
हे ही वाचा:
कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू
अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट
ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे
एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही
‘जगभरातून येणाऱ्या अभ्यागतांना उदयोन्मुख नवीन भारत दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या आम्हाला कल्पना दिल्या आणि भारताला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या रूपात कसे दाखवावे, यावर विचार केला,’ असे व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी भारताच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन करताना पत्रकारांना सांगितले.
जग कोरोना आणि त्याच्या रूपांसह जगणे शिकत असताना, १९० पेक्षा जास्त देश दुबई एक्स्पो २०२० मध्ये सहभागी झाले आहेत. दुबई एक्स्पो जे १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत सहा महिने चालू राहणार आहे. कोरोना महामारीमुळे हा एक्स्पो एक वर्ष उशिरा सुरू झाला असला तरी कोरोना संबंधित सर्व नियमांचे कठोरपणे पालन करून व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी पॅव्हेलियन चालू असणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीने भारताला ४० हजार चौरस फूट क्षेत्रावर कायमस्वरूपी पॅव्हेलियन बांधण्याची परवानगी दिली आहे. ही संधी काही निवडक मित्र देशांना देण्यात आलेली आहे.