चीनी नागरिकांची सीसीपी विरोधात रॅली

चीनी नागरिकांची सीसीपी विरोधात रॅली

चीनमध्ये गेली अनेक वर्षे कम्युनिस्ट पक्षाची अनिर्बंध सत्ता आहे. या राजवटीविरोधात खुद्द चीनमध्ये आवाज उठवण्याचे झालेले प्रयत्न ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ हे नाव मिरवणाऱ्या चीनने अतिशय क्रुरपणे दडपून टाकले होते. मात्र आता, विदेशातील चीनी नागरिकांनीच आपल्या सरकारविरुद्ध आवाज उठवायला सुरूवात केली आहे.

हे ही वाचा:

पोहरादेवी गर्दी प्रकरणात गुन्हा दाखल, पण संजय राठोडांचे नाव नाही

कॅनडामधल्या चीनी नागरिकांनी बर्लिंग्टन आणि ओन्टारियो शहरात, चीनी कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीतील गाड्यांवर चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात आवाज उठवण्यात आला होता. या रॅलीत सहभागी झालेल्या गाड्यांवर कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधातील बॅनर लावण्यात आले होते. यात ‘चायना लाईड, पीपल डाईड’ ‘कोविड-१९=सीसीपी व्हायरस’ अशा घोषणा लिहीण्यात आल्या होत्या. ही रॅली मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणांमधून नेण्यात आली, ज्यामुळे अधिकाधीक कॅनेडियन नागरिकांसमोर सीसीपीचा पर्दाफाश होऊ शकेल. त्यामुळे सामान्य कॅनेडियन नागरिकांत देखील, चीनमध्ये सीसीपी करत असलेल्या अत्याचारांबद्दल कळेल, आणि त्यांच्यात देखील याबाबत जागृती घडून येईल.

दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कॅनडाच्या संसदेने चीनच्या ऊईघुर मुस्लिमांच्या बाबतीतील धोरणाला नरसंहार म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, या रॅलीमुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्र्युड्यु यांच्यावर दबाव निर्माण झाला आहे.

Exit mobile version