राज्यसभेच्या जागांसाठी ४ ऑक्‍टोबरला होणार निवडणूक

राज्यसभेच्या जागांसाठी ४ ऑक्‍टोबरला होणार निवडणूक

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या ४ ऑक्‍टोबरला निवडणूजाहीर झालेली आहे. राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर ४ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. चार ऑक्टोबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाने पाच राज्यात रिक्त झालेल्या राज्यसभेच्या ६ जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ४ ऑक्टोबरला मतदान घेतले जाणार असून निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती गुरुवारी दिली. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या जागांचा यामध्ये समावेश आहे. पोटनिवडणुकीची अधिसुचना १५ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेस राजीव सातव यांच्या जागेवर कुणाला पाठवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकतंच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमलं आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. १५ सप्टेंबरला याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

हे ही वाचा:

दर्शनाचा लाभ घ्यावा ऑनलाइन असा…

माहितीपटातून उलगडणार शूमाकरचे आयुष्य

सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष

उत्तराखंडमधील छोट्याशा खेड्यात प्रत्येक घरात एक निकिता…

महाराष्ट्रात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय इतर पाच जागा या तिथल्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. यात थावरचंद गहलोत, मध्य प्रदेश, मानस भूनिया, प बंगाल, विश्वजीत दायमरी, आसाम, थिरू मनुस्वामी आणि थिरू वैथिलिंगम, तमिळनाडू यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक होणार आहे.

Exit mobile version