संरक्षण मंत्र्यांचा पाकव्याप्त काश्मीरबाबत पुन्हा एकदा अल्टिमेटम

पाकिस्तान पीओकेमधील लोकांवर अत्याचार करत असून त्याचे परिणाम भोगावे लागतील

संरक्षण मंत्र्यांचा पाकव्याप्त काश्मीरबाबत पुन्हा एकदा अल्टिमेटम

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर बाबत पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. पीओके गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये पोहोचल्यानंतरच जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वांगीण विकासाचे लक्ष्य साध्य होईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान पीओकेमधील लोकांवर अत्याचार करत असून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, असा इशाराही तंत्रक्षान मंत्र्यांनी दिला आहे.

आम्ही या भागाचा नुकताच विकास सुरू केला आहे. आता आम्ही उत्तर दिशेला वाटचाल करत आहोत. २२ फेब्रुवारी १९४९रोजी भारतीय संसदेत सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करून गिलगिट आणि बाल्टिस्तानसारख्या उर्वरित भागापर्यंत पोहोचल्यावर आमचा प्रवास पूर्ण होईल, तेव्हाच आमचे ध्येय पूर्ण होईल असेही राजनाथ सिंह म्हणाले.
५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांवरील भेदभाव संपुष्टात आल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील लोकांवरील भेदभाव संपुष्टात आला असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

कोणाचा दिवा विझतोय?

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

पाकिस्तानला किंमत चुकवावी लागेल

राजनाथ म्हणाले, ‘अनेकदा निरपराध भारतीयांवर अमानवी घटना घडतात. याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार आहे. पीओकेमधील लोकांवर पाकिस्तान जे अत्याचार करत आहे, त्याची किंमत आगामी काळात पाकिस्तानला चुकवावी लागेल. संरक्षण मंत्री म्हणाले, ‘दहशतवादाला धर्म नसतो. भारताला लक्ष्य करणे हेच दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे.

शौर्य दिन साजरा

१९४७ मध्ये या दिवशी भारतीय वायुसेनेचे श्रीनगरमध्ये आगमन झाल्याच्या स्मरणार्थ ‘शौर्य दिवस’ आयोजित करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या पीओकेमधील लोकांवर होणाऱ्या अत्याचारांवर इशारा देताना राजनाथ सिंह म्हणाले की, शेजारी देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.

Exit mobile version