26 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरदेश दुनिया'गांधी-गोडसे एक युद्ध' मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?

पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Google News Follow

Related

सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे अनेक वर्षांनी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची त्यांनी नुकतीच घोषणा केली आहे.

राजकुमार संतोषी नऊ वर्षांनी सिनेसृष्टीमध्ये पुनरागमन करत आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा शाहरुख खानच्या ‘पठाण’ या सिनेमाला टक्कर देणार असल्याचं म्हटले जातं आहे. नुकतंच या सिनेमाचं गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमात गांधी आणि गोडसे यांची भूमिका नक्की कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पवन चोप्रा आणि मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या सिनेमाचा भाग असू शकतात अशी चर्चा रंगली आहे. चिन्मय मांडलेकरने या सिनेमाची पहिली झलक ट्विटरवर शेअर केली आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शन प्रसिद्ध राजकुमार संतोषी करणार आहेत. तर ए. आर रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्वावर २६ जानेवारी २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीमध्ये कमालीची तफावत होती. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक खूप गाजलं होते. तर महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आली आहे. गांधी विरुद्ध गोडसे यांच्या विचारसरणीवर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या घोषणेने पुन्हा दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला

हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू

दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार संतोष यांनी ८० चं दशक चांगलच गाजवलं होतं. दामिनी, घातक, घायल, खाकी, अजब प्रेम की गजब कहामी, अंदाज अपना अपना असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे राजकुमार संतोषी यांनी दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा