32 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरदेश दुनियाजन्मशताब्दी ‘चित्रसृष्टीनाथा'ची

जन्मशताब्दी ‘चित्रसृष्टीनाथा’ची

शोमन राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा

Google News Follow

Related

उत्तमोत्तम गीतसंगीताचा खजाना, प्रतिभासंपन्न संगीतकारांची लाभलेली साथ, प्रणयप्रधान, भावनाप्रधान कथा यांच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीवर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते ‘शो मन’ राज कपूर यांची १४ डिसेंबर ही १००वी जयंती. आपल्या अभिजात कलेच्या आधारे भारतीय चित्रसृष्टीवर राज कपूर यांनी एक अनोखा ठसा उमटविला. १०० वर्षानंतरही राज कपूर यांच्या नावाचे गारुड भारतीय जनमानसावर कायम आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात राज कपूर यांच्या चित्रसृष्टीची वाटचाल झालेली आहे. सृष्टीनाथ कपूर हे राज कपूर यांचे मूळ नाव. पृथ्वीराज कपूर आणि रामसरनी कपूर यांच्या पोटी राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ला झाला आणि खऱ्या अर्थाने या निळ्या डोळ्यांच्या मुलाने तो चित्रसृष्टीनाथ असल्याचे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यात सिद्धही केले.

हे ही वाचा:

अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या मेहबूबला पळताना पोलिसांनी पायावर मारली गोळी

युवराजांनी पुन्हा संसदेत पाजळली

सोमवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार

स्वस्तिक मंडळाची प्रथम श्रेणी पूर्व विभागात विजेतेपदाची हॅट्ट्रिक

अभिनेता म्हणून पडद्यावर स्वतःची छाप पाडण्याआधी राज कपूर यांनी केदार शर्मा यांच्याकडे चित्रपट दिग्दर्शनाचे धडे गिरवले. आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये कला दिग्दर्शक म्हणून त्यांच्या वाटचालीचा प्रारंभ झाला. शिवाय, छोट्या छोट्या भूमिकांमधून हळूहळू या चित्रसृष्टीचा अनुभवही राज कपूर घेऊ लागले. १९४७च्या नील कमलमधून राज कपूर यांनी खऱ्या अर्थाने पदार्पण केले. त्याच्या पुढच्याच वर्षी आरके फिल्म्स स्टुडिओ नावाने राज कपूर यांनी आपली स्वतःची कंपनी सुरू केली. त्यातून मग एकापेक्षा एक असे सरस चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिले. आग (१९४८), बरसात (१९४९), आवारा (१९५१), श्री ४२० (१९५५), संगम (१९६४), मेरा नाम जोकर (१९७०), बॉबी (१९७३), सत्यम शिवम सुंदरम (१९७८), राम तेरी गंगा मैली (१९८५) या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकलीच पण भारतीय चित्रसृष्टीला समृद्ध केले.

गरीब युवक, रोमॅन्टिक तरुण, चार्ली चॅप्लिनसारखा अत्यंत संवेदनशील कलाकार, संगममध्ये नायिकेवर हक्क सांगणारा नायक, श्री ४२०मधील गरीबीतून बनवेगिरीकडे वळलेला तरुण अशा विविधांगी भूमिकांनी राज कपूर यांनी आपला प्रभाव पाडला. त्यांच्या या भूमिका अजूनही स्मरणात राहतात. नर्गिस, वैजयंती माला यांच्यासोबतचा त्यांचा अभिनय लाजवाब ठरला.

मेरा जुता है जपानी, आवारा हूँ, रमय्या वस्तावैय्या, प्यार हुआ इकरार हुआ, सजन रे झूठ मत बोलो, दोस्त दोस्त ना रहा अशी असंख्य गाणी आजही डोलायला लावतात. गायक मुकेश हे तर राज कपूर यांचा आवाज बनले होते. त्यांच्या अनेक गाण्यांनी चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले.

राज कपूर यांच्या या जयंतीच्या निमित्ताने कपूर कुटुंबियांनी १४ डिसेंबरलाच खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी संपूर्ण कपूर खानदार हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी रीतसर निमंत्रणही देण्यात आले. शिवाय, ऋषी कपूर यांचे सुपुत्र रणबीर कपूरची पत्नी आलिया हिने पंतप्रधानांना प्रश्न विचारले. त्याचीही खूप चर्चा झाली.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा