महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

रेल्वेने सुरु केले विशेष टूर पॅकेज

महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

आयआरसीटीसी यांच्यातर्फे शिवभक्तांना ‘बारा ज्योतिर्लिंगांना’ भेट देण्याची संधी देत आहेत. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हे विशेष टूर पॅकेज रेल्वेतर्फे सुरु करण्यात आले आहे.  येत्या शनिवारी १८ फेब्रुवारीला आपल्याकडे महाशिवरात्रीला मोठा उत्सव आहे. हिंदू धर्मात हा एक पवित्र दिवस मानला जातो. हाच महाशिवरात्रीचा दिवस म्हणून भारतीय रेल्वेने शिवभक्तांसाठी खास पॅकेज सुरु केले आहे.

कमी खर्चामध्ये १२ ज्योतिर्लिंगांना भेट देण्याची संधी रेल्वे देत आहेत. म्हणूनच या टूर पॅकेजला महाशिवरात्री नाव ज्योतिर्लिंग यात्रा असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून भाविकांना देशाच्या विविध भागात यौग्य दारात प्रवास करता येणार आहे. आसनसोल रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी ‘अमिताभ चॅटर्जी’ यांनी हि माहिती दिली. आहे.

यामध्ये भाविकांना ओंकारेश्वर  ज्योतिर्लिंग , महाकालेश्वर ज्योतिर्लिंग , सोमनाथ ज्योतिर्लिंग  ,त्रैम्बकेश्वर ज्योतिर्लिंग  , भीमाशंकर ज्योतिर्लिंग, घृणेश्वर  ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग , मल्लेश्वर ज्योतिर्लिंग, अशी सर्व ज्योतिर्लिंगांचा समावेश भारत दर्शन रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे.या यात्रेचे बुकिंग पर्यटन सुविधा केंद्रे, प्रादेशिक कार्यालये येथे करू शकता. हा संपूर्ण प्रवास हा १३ दिवस आणि १२ रात्रीचा आहे.

मदुराई येथून हा प्रवास सुरु करण्यात येणार असून तिरुनेलवेली , दिंडीगुल, इरोड, सेलम, काटपाडी, पेराम्बूर, नेल्लोर असे याचे बोर्डिंग पॉइंट असणार आहेत. पॅकेजचे शुल्क १५ हजार रुपये असून शिवभक्त आठ मार्च ते २० मार्च २०२३ या कालावधीमध्ये या सर्व ठिकाणी भेट देतील.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

काय आहेत सुविधा

या प्रवासात प्रवाशांना स्लीपर कोच मधून प्रवास करण्याची सुविधा मिळणार असून, प्रवाशांना ठिकठिकाणी राहण्यासाठी योग्य सुविधा मिळणार आहे. या शुल्कात प्रवाशांना नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण त्यासोबतच एक लिटर पाण्याची बाटली सुद्धा मिळणार आहे. याशिवाय टूर एस्कॉर्ट आणि सुरक्षा सुविधाही मिळणार आहेत.

Exit mobile version