गुजरातच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक ट्रॅकवर धावणार विशेष ट्रेन

'केवाडिया ते सोमनाथ' गौरव एसी  रेल्वे लवकरच 

गुजरातच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक ट्रॅकवर धावणार विशेष ट्रेन

केंद्र सरकारने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या योजनेअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित भारतीय रेल्वेने    विशेष पर्यटन पॅकेज सुरु केले आहे. भारतीय रेल्वे गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन द्वारे व्हायब्रण्ट गुजरातच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी गरवि गुजरात हा विशेष प्रवास सुरु करणार आहेत. आयआरसीटीसीद्वारे संचालित हि स्पेशल टुरिस्ट ट्रेन २८ फेब्रुवारीपासून दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकापासून सुरु होऊन ती  आठ दिवस एकूण प्रवास करेल. पर्यटकांच्या सोयीसाठी गुरुग्राम , रेवाडी , रिंगा , फुलेरा आणि अजमेर स्थानकांत बोर्डिंग आणि डी बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली म्हणून हे विशेष पॅकेज तैयार केले आहे. याचा पहिला थांबा हा केवडिया स्थानक असेल. जगातील सर्वात मोठा पुतळा अशी ख्याती असलेला सरदार पटेलांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हे मुख्य आकर्षण आहे.  संपूर्ण प्रवास हा साडेतीन हजार किलोमीटरचा असून पर्यटक आठ दिवस यातून प्रवास करतील. या रैल्वेच्या पॅकेज मध्ये जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी,चंपानेर पुरातत्व उद्यान,अडालजची वाव , अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम , मोढेरा सूर्य मंदिर, आणि पाटण कि राणी यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सोमनाथ ज्योतिर्लिंग , नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर,आणि बेट द्वारका हि पर्यटन ट्रेन ची ठिकाणे असतील.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

या विशेष पर्यटन ट्रेन मध्ये डिलक्स एसी सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवाय आधुनिक स्वयंपाकघर, खाण्या पिण्यासाठी रेस्टोरंट,प्रत्येक डब्यामध्ये शॉवर क्यूबिकल्स , वॉश रूम मध्ये सेन्सर आधारित कार्यक्षमता , फूट मसाजर,आणखीही इतर सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.याशिवाय पूर्ण गाडीमध्ये इंफोटेन्मेण्ट सिस्टिम बसवण्यात आली आहे. भारत गौरव ट्रेन च्या प्रवाशांकड़ून एसी दोन टियरसाठी प्रतिव्यक्ती ५२,२५० रुपये ते एसी एक केबिनमध्ये प्रति प्रवासी ६७,१४० रुपये एवढे आणि एसी एक कूपचा दार प्रति प्रवासी ७७,४०० रुपये इतका आकारणार असल्याचे निश्चित केले आहे. या आठ दिवसांमध्ये आयआरसीटीसी ट्रेन टूर पॅकेज मध्ये राहणे, जेवण, व्हिसा , आणि इतर मार्गदर्शक सुविधा शिवाय बसमधून प्रेक्षणीय स्थळे पाहणे आणि ट्रेन प्रवासांत सर्व खर्च समाविष्ट आहे.

Exit mobile version