रेल्वे होणार प्रदुषण मुक्त

रेल्वे होणार प्रदुषण मुक्त

या अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षांत भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या बरोबरच २०३० पर्यंत भारतीय रेल्वेला जगातील पहिली प्रदुषण विरहीत रेल्वे बनविण्याचे ध्येय देखील निश्चित करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहिती नुसार २०२३ पर्यंत भारतीय रेल्वेवरून डिझेल हद्दपार होईल. डिझेल पासून मुक्ती मिळवल्यामुळे देशातील एकूण वायू प्रदुषणात घट होईल. रस्ते आणि रेल्वेच्या गुंतवणुकीमुळे देशाच्या विकासात वाढ होईल असेही पियुष गोयल यांनी सांगितले.

जागरण या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार त्यांनी सांगितले मोदी सरकारच्या पूर्वी देशात रेल्वेवर केवळ ४०-४५ हजार करोड रुपये खर्च होत असत. या वर्षी अर्थमंत्रालयाकडून रेल्वेत २ लाख १५ हजार करोड रुपयांची गुंतवणुक करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. अशाच प्रकारे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करण्यात येईल.

या वेळी रेल्वे मंत्र्यांनी बुलेट ट्रेनवर देखील भाष्य केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जमिन मिळण्यास झालेल्या उशिरमुळे आणि कोरोनामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशिर झाला आहे. गुजरात मधील जमिन हस्तांतरणाचे काम ९० टक्के पुर्ण देखील झाले आहे. मुंबई- अहमदाबाद प्रमाणेच इतर सात मार्गांवर हायस्पीड रेल्वे चालू करण्यात येणार आहे.

Exit mobile version