भारताची बदनामी करताना राहुल गांधींसोबत होते पाकचे कमाल मुनीर

राहुल गांधी यांच्याकडून केंब्रिजमध्ये भारताची बदनामी

भारताची बदनामी करताना राहुल गांधींसोबत होते पाकचे कमाल मुनीर

भारत आणि भारतीय संस्थांच्या विरोधात परदेशातील व्यासपीठावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ हीच चूक केली नाही तर त्यावेळी पाकिस्तानी वंशाचे प्राध्यापक कमाल मुनीर यांच्यासोबत ते व्यासपीठावर हे विचार मांडत होते.

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी यासंदर्भात टीका केली असून ते म्हणतात की, राहुल गांधी यांनी केवळ भारताच्या कारभारात परकीयांनी हस्तक्षेप करण्याची मागणीच केली नाही तर त्यांनी चक्क पाकिस्तानच्या कमाल मुनीर यांच्यासोबत व्यासपीठावर भारताची बदनामी केली.

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या वादग्रस्त भाषणात त्यांनी भारतात लोकशाही राहिलेली नाही, असा दावा केला. गंमत म्हणजे आपण एका परकीय विद्यापीठात बोलतो आहोत तिथे बोलण्याची मुभा आपल्याला लोकशाहीमुळेच मिळाली आहे, याचा मात्र राहुल गांधी यांना पूर्ण विसर पडला.

हे ही वाचा:

औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?

आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”

आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’

इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर

तिथेही त्यांनी भारत हा युरोपियन संघाप्रमाणेच असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे याविषयी राहुल गांधी यांचे समर्थकही तोच दावा करतात. युरोपियन संघ हा विविध युरोपियन देशांचा बनला आहे, हे माहीत असतानाही राहुल गांधी लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत आणि या भाषणातही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला.

आपल्याला अनेकवेळा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली असे सपशेल लोणकढी थापही त्यांनी या भाषणात मारली. त्यासाठी त्यांनी संसदेतले एक छायाचित्र शेअर केले प्रत्यक्षात ते हाथरसचे होते. २०२०मध्ये हाथरसमध्ये झालेल्या बलात्कारप्रकरणी राहुल आणि प्रियंका गांधी तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना अडविण्यात आले होते.

राहुल गांधी यांनी आणखी एक थाप मारली ती म्हणजे पेगॅसस या ऍपच्या सहाय्याने आपल्यावर लक्ष ठेवण्यात आले. अमेरिकेत आपण थेट विमानात जाऊ शकत होतो आता मात्र भारतात आपले ओळखपत्र तपासले जाते.

Exit mobile version