26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियागाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा

गाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा

नागरिकांना बाहेर काढण्याची इस्रायल संरक्षण दलाची योजना

Google News Follow

Related

गाझाचे दक्षिणेकडील शहर रफा म्हणजे सीमेवरचे शहर. ते आतापर्यंत इस्त्रायली हल्ल्यापासून वाचलेले जवळपास शेवटच्या ठिकाण मानले जाते. पॅलिस्टिनी आणि इस्रायलच्या युद्धातून वाचण्यासाठी अनेकांनी रफाहमध्ये आश्रय घेतला आहे. येथील घरांत, तसेच पदपथांवर अनेक जण तंबू उभारून कुटुंबासह राहात आहेत. मात्र इस्रायलने आता राफावर हल्ला करण्याचा इरादा व्यक्त केल्यानंतर ते हादरले आहेत. गाझामधील सुमारे निम्म्याहून अधिक म्हणजे १५ लाख नागरिकांनी येथे आश्रय घेतला आहे. पळून जाण्यासाठी त्यांच्यासमोर अन्य कोणताच मार्ग शिल्लक नाही.

‘आम्ही दमलो आहोत. आम्ही थकलो आहोत. इस्रायल त्यांना हवे ते करू शकते. मी माझ्या तंबूत बसलो आहे. मी माझ्या तंबूत मरेन,’ असे जिहान अल-हवाजरी सांगतो. जो गाझा पट्टीच्या लांब उत्तरेकडून अनेक वेळा पळून गेला आणि आता तंबूत ३० नातेवाइकांसह राहतो.

संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी राफावरील हल्ला हा नव्या संकटाला आमंत्रण देणारा असेल, असा इशरा दिला आहे. तेथे आश्रयाला आलेल्या सहा लाख मुलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. गाझाची नागरिकांना जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारी मानवतावादी मदत प्रणाली कोसळू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तर, इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासचा नाश सुनिश्चित करण्यासाठी रफा घेणे आवश्यक आहे.

शुक्रवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सैन्याला हे शहर रिकामे करण्यासंदर्भात तयार राहण्याचे आदेश दिले. तर, ‘लाखो लोकांचा आश्रय असलेल्या भागात कोणतेही नियोजनआणि थोडासा विचार न करता सध्या अशी कारवाई करणे ही आपत्ती ठरेल,’ असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘याचे आम्ही समर्थन करू शकत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

दिल्लीत अतिक्रमणविरोधी मोहिमेत मशिद, मंदिरे आणि दफनभूमीवर बुलडोझर

हल्दवानी घटनेनंतर ५००० जणांविरुद्ध गुन्हा

गोळीबार प्रकरणातील जखमी भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंची प्राणज्योत मालवली

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातल्या मॉरीसने म्हणून नेमला अंगरक्षक

राफामधील नागरिक कोठे स्थलांतर करतील, हे स्पष्ट नाही. राफाच्या दक्षिणेला इजिप्त, पश्चिमेला भूमध्य समुद्र, पूर्वेला इस्रायल आणि उत्तरेला इस्रायली सैन्याच्या कोंडीत ते अडकले आहेत. युद्धाच्या सुरुवातीला, इस्रायलने रफाच्या किनाऱ्यावरील ग्रामीण भागाला सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले. परंतु अलीकडच्या आठवड्यात इस्रायलकडून येथेही बॉम्बफेक करण्यात आली. त्यातील काही भाग ताब्यात घेण्यासाठी सैन्य पाठवण्यात आले आहे. राफामधील बरेच पॅलेस्टिनी गाझा शहर आणि उत्तरेकडील इतर भागांतून आले होते आणि त्यांना तेथे परत यायचे आहे. इजिप्तने त्यांच्या भूमीवर पॅलेस्टिनींना पाऊल ठेवण्यास नकार दिला आहे. तर, स्वतः इस्रायल लाखो पॅलेस्टिनींना स्वतःच्या भूभागावर आश्रय देणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा