राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावांपासून ज्याचे नाव बनले असा न्यूझीलंड क्रिकेट संघाचा खेळाडू राचिन रवींद्र याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चक्क सचिनचाच विक्रम मागे टाकला. त्यामुळे त्याचा हा विक्रम विशेष ठरला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राचिनने वर्ल्डकपमधील आपला झपाटा कायम ठेवला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने ९४ चेंडूंत १०८ धावांची खेळी केली. त्यात एक षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. हे त्याचे या वर्ल्डकपमधील तिसरे शतक ठरले. सचिनचा विक्रम त्याने मागे टाकला. विशेष म्हणजे वयाची २५ वर्षे पूर्ण करण्याच्या आतच त्याने हा विक्रम करून दाखविला आहे. सचिननेदेखील वयाची २५ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी वर्ल्डकपमधील दोन शतके ठोकली होती.
या विक्रमासह राचिनने वर्ल्डकपमधील सचिनच्या सर्वाधिक धावांचा विक्रमही मागे टाकला. सचिनने १९९६मध्ये ५३२ धावा केल्या होत्या. तेदेखील त्याची २५ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच. त्या विक्रमालाही राचिनने मागे टाकून सचिनला एकप्रकारे भेट दिली आहे. राचिन हा एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांनी आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये दोन शतके ठोकली आहेत.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ
गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य
छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!
पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला
या विक्रमासह राचिन आणखी काही विक्रम नोंदविण्याच्या प्रतीक्षेत आहे. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने ११ डावात ५३२ धावा केलेल्या आहेत २०१९च्या वर्ल्डकपमध्ये. त्यासाठी राचिनला आता अवघ्या ९ धावा हव्यात. शिवाय, पहिल्याच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणूनही त्याला विक्रम करण्याची संधी आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने केन विल्यमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी केली. त्यात विल्यमसनच्या ९५ धावा होत्या. त्यांच्या या भागीदारीमुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ४०१ धावा केल्या. त्याला पाकिस्ताननेही चांगले उत्तर दिले होते. २५ षटकांत त्यांनी १ बाद २०० धावा केल्या होत्या.