आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज

भारताच्या आर. प्रज्ञानंद या गुणवान बुद्धिबळपटूने जागतिक उपविजेत्या फॅबिआनो करुआना याचा टायब्रेकरमध्ये पराभव करून बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आता त्याची गाठ अंतिम फेरीत जागतिक स्तरावर अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी पडेल.

 

भारतासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानंद हा गेल्या २१ वर्षांतील पहिला भारतीय आहे. याआधी ही कामगिरी विश्वनाथन आनंद याने सन २००० आणि २००२मध्ये केली होती. त्यावेळी दोनदा त्याने विश्वचषक जिंकला होता.

हे ही वाचा:

बस झाले! विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात आता बदल नाही

मुख्यमंत्री शिंदे रात्री अचानक केईएम रुग्णालयात अवतरले

एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस

५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार

भारतीय किशोरवयीन ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने सोमवारी अझरबैजानमधील बाकू येथे फिडे विश्वचषक उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनावर उल्लेखनीय विजय मिळवला. अमेरिकन ग्रँडमास्टरविरुद्धच्या टायब्रेकच्या विजयाने प्रज्ञानंदची जलद विचार करण्याची क्षमता आणि धोरणात्मक कौशल्य दाखवून दिले आहे. या कष्टाने मिळवलेल्या विजयाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध आता प्रज्ञानंदची लढत होईल.

 

भारतासाठी या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानंदा २१ वर्षांतील पहिला भारतीय आहे. विश्वनाथन आनंद याआधी दोनदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. प्रज्ञानंदाने ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आनंदनेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ‘प्रज्ञा अंतिम फेरीत पोहोचला! त्याने टायब्रेकरमध्ये फॅबियानो कारुआनाला पराभूत केले आणि आता मॅग्नस कार्लसनचा सामना होईल. काय कामगिरी आहे!’, अशी प्रतिक्रिया आनंदने ‘एक्स’वर दिल आहे. देशातील अनेकांना वाटलेला उत्साह आणि अभिमानाला त्याने या कौतुकातून वाट मोकळी करून दिली.

Exit mobile version