27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियापोलिसांच्या परवानगीनंतर स्वीडनमध्ये मशिदीसमोर आंदोलकाने केले कुराणाचे दहन

पोलिसांच्या परवानगीनंतर स्वीडनमध्ये मशिदीसमोर आंदोलकाने केले कुराणाचे दहन

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री फिदान यांनी या घटनेची निंदा केली आहे.

Google News Follow

Related

स्वीडनमध्ये सलवान मोमिका नावाचा आंदोलकाने इस्लामच्या विरोधात मशिदीच्या बाहेर कुराणाच्या प्रतीचे दहन स्टॉकहोममधील मशिदीबाहेर करून निदर्शने केली आहेत.

‘आम्हाला सांगायचे आहे की, स्वीडनवासी आता तरी जागे व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही मुस्लिमांच्या नव्हे तर त्यांच्या विचारांच्या विरोधात आहोत,’ असे मोमिका याने म्हटले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वीडनच्या पोलिसांनीही त्याला कुराणाच्या प्रती दहन करण्याची परवानगी दिली होती.

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री फिदान यांनी या घटनेची निंदा केली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारावार अशा इस्लामविरोधी निदर्शनांना परवानगी देणे स्वीकारार्ह नाही.

देशातील मुख्य मशिदीबाहेर कुराणाच्या प्रतींचे दहन करण्याची मुभा पोलिसांनी या आंदोलकाला दिली होती. अर्थात ही मंजुरी केवळ एक दिवसाच्याच आंदोलनासाठी देण्यात आली होती. ‘आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही तर त्यांच्या बाजूनेच आहोत. मात्र मुस्लिम धर्माचा खूप नकारात्मक परिणाम होत आहे आणि त्यावर जगभरात बंदी आणली पाहिजे,’ असे सलवानचे म्हणणे आहे.

पोलिसांनी का दिली मंजुरी?

याआधी स्वीडन पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये इराकच्या दूतावासाबाहेर त्याला कुराणचे दहन करण्यापासून रोखले होते. यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे होते. एका नाटोविरोधी समूहावरही कुराणाच्या प्रतीचे दहन केल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. मात्र या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयाने ही बंदी हटवली. देशाच्या राज्यघटनेनुसार, आंदोलकांना एकत्रित येऊन निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यामुळे त्यांनी देशापुढे संकट आणता कामा नये. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगत न्यायालयाने या आंदोलकांना परवानगी दिली आहे. याआधी आंदोलकांनी स्टॉकहोममध्ये इराकच्या दूतावासाबाहेर कुराणचे दहन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर या आंदोलकांनी न्यायालयात दाद मागितली होती.

हे ही वाचा:

 पिकनिकला गेलेल्यांची कार पडली ३० फूट खड्ड्यात; तिघे दगावले!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध !

सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

 

अमेरिकेच्या उपप्रवक्त्याने या घटनेची दखल घेत धार्मिक पुस्तकांचे दहन ही अनादर करणारी, मन दुखावणारी कृती आहे, असे विधान त्यांनी केले.

सदर आंदोलकाच्या विरोधात तिथे घोषणाबाजी झाली. एकाने त्याच्यावर दगडही भिरकावला. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. या मशिदीतील प्रतिनिधींनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या निदर्शकाला परवानगी का दिली अशी विचारणा त्यांनी केली. मुख्य म्हणजे ईदच्या दिवशी हे आंदोलन त्याने केल्याबद्दल संताप व्यक्त केला गेला.

स्वीडनच्या नाटो सदस्यत्वावर परिणाम

स्वीडन पोलिसांच्या या निर्णयामुळे स्वीडनच्या नाटो सदस्यत्वावर परिणाम होऊ शकतो. याआधीही स्वीडनमध्ये कुराणाचे दहन करण्यात आले आहे. त्यामुळे स्वीडनला नाटो सदस्यत्व देण्याची प्रक्रिया अडकली होती. स्वीडनमध्ये मुस्लिम धर्माविरोधात होणाऱ्या आंदोलनांमुळे तुर्कीशी त्यांचे संबंध तणावाचे झाले आहेत. त्यामुळे नाटोमध्ये स्वीडनला सदस्यत्व देण्यात तुर्की अडथळे आणत आहे. जानेवारी महिन्यातही स्वीडनमध्ये कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे सौदी अरेबिया, पाकिस्तानसह अनेक देशांनी यावर टीका केली होती. स्वीडनमध्ये दक्षिणपंथी विचारांचे स्ट्राम कुर्स पक्षाचे नेते रासमुस पैलुदान यांनी नाटो सदस्यत्वाच्या प्रश्नावर तुर्कीशी असणाऱ्या तणावाच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर तुर्की दुतावासाबाहेर कुराणाच्या प्रतींचे दहन केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा