मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह परदेशात पळून गेल्याची शंका आता अधिक गडद झालेली आहे. मुंबईतील तपास यंत्रणा आता माजी पोलीस आयुक्तांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे एक मोठे विधान समोर आलेले आहे. माध्यमांशी बोलताना, दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, परमबीर हे देशाबाहेर गेले असतील तर ते योग्य नाही. ते परदेशात गेलेत असे मी ऐकले आहे. पण परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी सरकारला तसे कळविणे आवश्यक होते. परमबीर सिंह १०० कोटींच्या वसुली प्रकरणात आरोपी आहेत. अँटिलिया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएने परमबीर सिंह यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले.
परंतु आजपर्यंत समन्स पाठवण्यात आलेला नाही. यानंतर, एनआयए आणि महाराष्ट्र राज्याच्या तपास यंत्रणांचा संशय बळावला की परमबीर सिंग अटकच्या भीतीने देश सोडून पळून गेले. एनआयएला त्याचा अधिक तपास करण्यासाठी परमबीर सिंगची चौकशी करायची होती, पण आता परमबीर यांचा ठावठिकाणा सापडत नाही. परमबीर सिंहच्या शोधाकरता अनेक ठिकाणी छापेमारी सुद्धा करण्यात आली. परंतु सिंह यांचा सुगावा काही लागला नाही.
हे ही वाचा:
महिला निदर्शकांबाबत तालिबानने काय केले?
फिनिक्स मॉलसमोरील उड्डाणपुलावर दोन दुचाकीस्वार झाले ठार…
मोदींनी का केले किरण रिजिजूंचे कौतुक?
शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात
एजन्सींना संशय आहे की, परमबीर सिंह हे सध्याच्या घडीला युरोपियन देशात लपले आहेत. यासंदर्भात मात्र आतापर्यंत कोणतेही पुरावे सापडले नाहीत. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मते, माजी पोलीस आयुक्त परदेशात पळून गेल्याची माहिती गृह विभागाला मिळाली आहे. ही गंभीर बाब असल्याचेही वळसे म्हणाले. अशा प्रकरणांमध्ये परमबीर यांच्यावर गंभीर आरोप असल्याने आरोपींना बाहेर जाण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते. परंतु परमबीर यांनी तसे केले नाही. महाराष्ट्र पोलीस सध्याच्या घडीला परमबीर सिंह यांचा शोध घेत आहेत